कृषी महाराष्ट्र

नंदुरबार जिल्ह्यात अनुदानापोटी बारा कोटींचे वाटप ! वाचा सविस्तर

नंदुरबार जिल्ह्यात अनुदानापोटी बारा कोटींचे वाटप ! वाचा सविस्तर

 

Nandurbar Agriculture Subsidy News : कृषी विभागामार्फत (Agricultural Department) कृषी यांत्रिकीकरण (Agriculture Mechanization) उपअभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना या तीनही योजनांतर्गत नंदुरबार जिल्ह्यात २०२२-२३ या आर्थिक वर्षांत आजपर्यंत एक हजार ८७४ शेतकऱ्यांना बारा कोटी २४ लाख २८ हजार रुपयांचे अनुदान (Subsidy) वाटप करण्यात आले आहे.

यात राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत २०२२-२३मध्ये १ एप्रिल २०२२पासून आजपर्यंत अनुसूचित जातीच्या ६ लाभार्थ्यांना २.२१ लाख, अनुसूचित जमातीच्या १९० लाभार्थ्यांना ८८.०८ लाख, सर्वसाधारणच्या १०४ लाभार्थ्यांना ३९.४६ लाख अशा एकूण तीनशे लाभार्थ्यांना १२९.७५ लाख रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. Subsidy Allocation

कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या २६ लाभार्थ्यांना १६.६१ लाख, अनुसूचित जमातीच्या ३३७ लाभार्थ्यांना २२५.३१ लाख, तर सर्वसाधारण गटाच्या ८० लाभार्थ्यांना १८२.१६ लाख असे एकूण ४४३ लाभार्थ्यांना ४२४.०८ लाख रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेंतर्गत सर्वसाधारण गटाच्या १ हजार १३१ लाभार्थ्यांना ६७०.४५ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.

मुदतीत लाभ बंधनकारक

लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर अधिकृत विक्रेत्याकडून अवजारे, यंत्रांचे दर कोटेशन, टेस्टिंग रिपोर्ट, मागास प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र आदी पोर्टलवर अपलोड करावेत. या कागदपत्रांच्या छाननीनंतर कृषी विभागामार्फत पूर्वसंमती प्रक्रिया पूर्ण होते.

पूर्वसंमती दिल्यानंतर ३० दिवसांच्या आत अवजारे व यंत्रे खरेदी करून बिल अपलोड करणे बंधनकारक आहे. Subsidy Allocation

निकषांमध्ये बदल

यंदापासून (२०२२-२३) कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही बदल केले आहेत. त्यानुसार ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी आर. सी. बुक बंधनकारक राहील.

रोखीने खरेदी न करता कॅशलेस पद्धतीने अवजारांची खरेदी करणे, पूर्वसंमती अपलोड केलेल्या कोटेशन व रिपोर्टप्रमाणेच अवजाराची खरेदी करणे बंधनकारक राहील. एकाच वर्षात जास्तीत जास्त ३ अवजारे किंवा अनुदान रक्कम एक लाखपर्यंत लाभ देण्यात येईल.

अनुदानाची रक्कम रुपये एक लाखापेक्षा जास्त असेल, अशा अवजारासाठी एका वर्षात फक्त एकच अवजारासाठी अनुदान देय राहील. अनुदान देण्यात आलेल्या ट्रॅक्टरची किमान सहा वर्षे व ट्रॅक्टरचलित अवजाराची किमान ३ वर्षे विक्री करता येणार नाही.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top