एका क्लिकवर जाणून घ्या पीएम कुसुम योजनेत तुमचा अर्ज पात्र की अपात्र
PM Kusum Yojana | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या फायदेशीर योजना राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे (Agriculture) वीज बिल कमी करून 24 तास सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने (PM Kusum Yojana) सौरपंप अनुदान योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये पीएम कुसुम योजना (Pm Kusum Yojana) अंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिला जातो.
राज्य सरकार शेतकऱ्यांना सौरपंप (Solar Pump) बसवण्यासाठी त्यांनी ठरवून दिलेल्या अटी आणि नियमांनुसार अनुदानाचा लाभ देत आहेत. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात (Agriculture) सौर पंप बसवण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जात आहे. राज्यातील इच्छुक शेतकरी या योजनेंतर्गत अर्ज करून शासनाकडून सौरपंपासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात.
पीएम कुसुम योजना काय आहे ?
ही योजना 2019 मध्ये सौरऊर्जेला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. विशेषत: ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. जेणेकरून ते सौरऊर्जेच्या साहाय्याने वीज निर्माण करू शकतील आणि त्यांच्या व जवळपासच्या शेतात सिंचन करू शकतील.
सौर कृषी पंप
शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या (Agricultural Pump) साहाय्याने दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे. यासाठी सरकारच्या वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. योजनांचा लाभ घेऊन शेतकरी आपल्या शेतामध्ये सोलर पंप बसवू शकतात. शेतकरी आता या सौर कृषी पंपाने पिकाला पाणी देऊन पिकाला जीवनदान देत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पीक उत्पादन काढत आहेत.
तुमचा अर्ज पात्र की अपात्र ?
शेतीतील पिकाला दिवसा सिंचन मिळावे यासाठी पीएम कुसुम योजनेमध्ये अर्ज केला असेल, तर तुमचा हा अर्ज पात्र ठरला की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्हाला https://kusum.mahaurja.com/beneficiary/ या लिंकवर जावे लागेल. यावर तुम्ही तुमचा अर्ज पात्र आहे की अपात्र हे सहज पाहू शकता.
किती सबसिडी मिळते ?
पीएम कुसुम योजनेंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौरपंप बसवण्यासाठी 60 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये 30 टक्के केंद्र आणि 30 टक्के राज्य सरकार देते. 30 टक्के कर्ज बँकेकडून घेता येते, उर्वरित 10 टक्के रक्कम शेतकऱ्यांना द्यावी लागते.
पीएम कुसुम योजनेतील अर्जासाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- नोंदणीची प्रत
- अधिकृतता पत्र
- शेत किंवा जमिनीच्या ठेवीची प्रत
- आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक
- बँक खात्याचा तपशील
- पासपोर्ट आकाराचा फोटो
source : mieshetkari.com