कृषी महाराष्ट्र

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा

किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना मिळणार महत्वाची सुविधा

 

केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. पीएम किसान सन्मान निधी, किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) अशा अनेक योजना सुरू आहेत, ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो.

आता शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका विशेष योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. ज्यामधून शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट होणार आहे. सीतारामन यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना किसान क्रेडिट कार्ड (KCC) अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज देण्यास सांगितले आहे.

किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना 5 वर्षांसाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्प मुदतीचे कर्ज दिले जाते. किसान क्रेडिट कार्डवर (Kisan Credit Card) घेतलेल्या पैशावर सरकारकडून सबसिडी दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना सहसा कमी व्याज द्यावे लागते.

किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज असा करा

तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हवे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करू शकता. यामध्ये मागितलेली कागदपत्रेही सादर करावी लागणार आहेत. यामध्ये 2 पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतील. याशिवाय पेरणी केलेल्या पिकाची माहितीही तुम्हाला द्यावी लागेल. किसान क्रेडिट कार्डद्वारे

किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • मतदार ओळखपत्र
 • आधार कार्ड
 • चालक परवाना
 • पासपोर्ट
 • शेतकऱ्याच्या जमिनीची कागदपत्रे

किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे

 1. पैशाच्‍या वाटपाच्‍या पध्‍दती सोप्‍या करते
 2. नगद आणि स्‍वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते
 3. प्रत्‍येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्‍याची गरज नाही
 4. शेतकरयासाठी व्‍याजाचा भार कमी करणे शक्‍य करीत कोणत्‍या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्‍याची हमी
 5. शेतकरयाच्‍या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्‍यास मदत करते
 6. डीलर्स कडून कॅश अव्‍हेल डिस्‍काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्‍यास मदत करते
 7. वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा – हंगामी मूल्‍यांकनाची गरज नाही
 8. जास्‍तीत जास्‍त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्‍या उत्‍पन्नावर आधारित
 9. किती वेळा पैसे काढू शकता ती संख्‍या कर्ज सीमेवर अवलंबून
 10. परतफेड फक्‍त हंगामा नंतर
 11. शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर व्‍याज दर लागू असल्‍याप्रमाणे
 12. जामीन, मार्जिन व दस्‍तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्‍या आगावू रकमेवर लागू असल्‍याप्रमाणे

भारतातील अग्रगण्‍य बँकांची किसान क्रेडिट कार्डस्

अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
आन्‍ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड
बँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)
बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
कॅनरा बँक – केसीसी
कॉरपोरेशन बँक – केसीसी
देना बँक – किसान गोल्‍ड क्रेडिट कार्ड
ओरिएन्‍टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्‍टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
पंजाब नॅशनल बँक – पीएनबी कृषि कार्ड
स्‍टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी
स्‍टेट बँक ऑफ इंडिया – केसीसी
सिंडिकेट बँक – एसकेसीसी
विजया बँक – विजया किसान कार्ड

श्रोत :- krishijagran.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top