कृषी महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपिटीचा इशारा ! हवामान खात्याचा अंदाज

उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यात गारपिटीचा इशारा ! हवामान खात्याचा अंदाज

उत्तर महाराष्ट्र व

राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सोमवारी हलक्या सरींना (Rainfall) शिडकावा केला आहे.  ता. १५ पासून राज्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात ढगाळ हवामान होत असले तरी, कमाल तापमान कमी-अधिक होत आहे. कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे असल्याने, तसेच तापमानात सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी वाढ झाल्याने सांताक्रुझ आणि रत्नागिरी येथे गेले काही दिवस उष्णतेची लाट कायम होती.

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रुझ येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश, तर रत्नागिरी येथे ३७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांच्या दरम्यान होते. रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक ते कोकण पर्यंत समुद्रसपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. झारखंड ते तेलंगणा दरम्यान आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

यातच बंगालच्या उपसागरावरून वाहणारे बाष्पयुक्त वारे आणि पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्टा यांच्या एकत्र प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक वातावरण झाले आहे. यामुळे पोषक हवामान झाल्याने आज (ता. १७) राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात जिल्ह्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे, विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तर कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

आपल्याला जर कृषी महाराष्ट्रची माहिती आवडत असेल तर कृपया आपल्या शेतकरी मित्रांना देखील पाठवा.

source : krishijagran

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top