कृषी महाराष्ट्र

आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन कसे करावे ? वाचा सविस्तर

आपत्कालीन परिस्थितीत पीक नियोजन कसे करावे ? वाचा सविस्तर

 

Kharif Season : दरवर्षी सर्वसाधारणपणे जून महिन्यात ७ तारखेपर्यंत पावसाचे आगमन होत असते. तेथून पुढे शेतीची मशागत करून गळीत धान्ये (भुईमूग, तीळ, सूर्यफूल इ.), कडधान्ये (मूग, उडीद, चवळी इ.), तृणधान्ये (मका, ज्वारी, बाजरी, चारा पिके इ.) नगदी पिके (कापूस) यांची पेरणी करणे शक्य होते.

मात्र या वर्षी खरीप हंगामामध्ये (Kharif Season) जून महिन्यात अजिबात पाऊस पडला नाही. आता जुलै महिन्याचे काही दिवसही उलटून गेले आहेत.

अशा स्थितीमध्ये मूग, उडीद, ज्वारी व कापूस इ. पिकांची पेरणी (Crop Sowing) करणे अशक्य आहे. परिणामी, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडत चालली आहे. पूर्ण खरीप हंगाम खाली घालवणे आर्थिकदृष्ट्या कोणालाच परवडणारे नाही. अशा आपत्कालीन स्थितीमध्ये उशिरा पेरणी म्हणजे जुलै महिन्यापासून पुढे कोणत्याही पिकाची लागवड करता येईल, याची माहिती घेऊ.

महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार नऊ उपविभाग पडतात. यामध्ये चार कृषी विद्यापीठे कार्यरत असून, त्यांच्या कार्यक्षेत्रातील आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पीक नियोजन शिफारशी पुढीलप्रमाणे आहेत.

पश्‍चिम महाराष्ट्र व खानदेश विभाग : यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, तर खानदेशातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो.

जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा –

बाजरी – फुले धनशक्ती, फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
मटकी – एमबीएस-२७, फुले सरिता
तूर – फुले राजेश्‍वरी, गोदावरी, बीडीएन- ७११, बीएसएमआर- ७३६, भीमा, पीकेव्ही तारा, बीडीएन- ७१६

हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
राजगिरा – फुले सुवर्णा
सूर्यफूल – फुले भास्कर, भानू, मॉर्डन, एलएफएसएच -१
चवळी – फुले विठाई
तूर + गवार (पुसा सदाबहार, पुसा नवबहार)

मका – राजर्षी, फुले महर्षी, आफ्रिकन टॉल
मधुमका – फुले मधू, माधुरी
गुणात्मक प्रथिनयुक्त मका- एचक्यूपीएम- १ ते ५, बेबीकॉर्न (एमएच-४,५)
तूर + शेपू (स्थानिक वाण)
तूर + कोथिंबीर (इंदोर -१,२, जबलपूर) Emergency Crop Planning

मराठवाडा विभाग :

यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली व धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो.

जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा –

बाजरी – फुले धनशक्ती, फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती

तूर – बीएसएमआर- ७३६, बीएसएमआर- ८५३, बीडीएन-७११, बीडीएन-७१६, गोदावरी, फुले राजेश्‍वरी, भीमा
हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
राजगिरा – फुले सुवर्णा
सूर्यफूल – फुले भास्कर, भानू
चवळी – फुले विठाई

तूर + गवार (पुसा सदाबहार, पुसा नवबहार)
मका – राजर्षी, फुले महर्षी, आफ्रिकन टॉल
मधुमका – फुले मधू, माधुरी, प्रिया, एचएससी-१
गुणात्मक प्रथिनयुक्त मका – एचक्यूपीएम- १ ते ५, बेबीकॉर्न (एमएच-४,५)
पॉपकॉर्न – अंबर पॉपकॉर्न, जवाहर पॉपकॉर्न Emergency Crop Planning

विदर्भ विभाग –

या विभागात अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश होतो.

जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा –

तूर – पीकेव्ही तारा,गोदावरी, फुले राजेश्‍वरी, भीमा
बाजरी – फुले धनशक्ती, फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती

हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
सूर्यफूल – फुले भास्कर, भानू
चवळी – फुले विठाई

अति पर्जन्यमान विभाग –

अति पर्जन्यमान विभागात इगतपुरी, महाबळेश्‍वर, कोकण, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, सिंदेवाही व साकोली यांचा समावेश होतो.
जुलैचा दुसरा / तिसरा आठवडा –
भात – गरवा वाण – रत्नागिरी-२, कर्जत-२, ८,१०, पीडीकेव्ही- तिलक
हुलगा (कुलथी) – फुले सकस, सीना, माण
वाल – पावटा
तूर – पीकेव्ही तारा, गोदावरी, फुले राजेश्‍वरी
नागली (नाचणी) – फुले नाचणी, फुले कासारी
वरई – फुले एकादशी (गरवा वाण)
बर्टी – फुले बर्टी -१

आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी ठळक बाबी –

– पीक उत्पादनातील जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
-राज्य शासन राबवीत असलेल्या कोरडवाहू शेती अभियानांतर्गत पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यात येत असून, त्यांच्या शिफारशींची माहिती व लाभ घ्यावा.
-मजूर कमतरता लक्षात घेता मूलस्थानी जलसंधारणासाठी यांत्रिकीकरणाचा अवलंब करावा. त्यासाठी कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रमांतर्गत अनुदानावर यंत्राची उपलब्धता केली जात आहे.
-पिकांच्या संवेदनशील अवस्थेत पाणीपुरवठा करण्यासाठी शेततळे निर्मिती करण्याकडे लक्ष द्यावे.
-आपापल्या विभागात प्रत्यक्षात पावसास होणारी सुरुवात विचारात घेऊन कृषी विद्यापीठांनी दिलेल्या शिफारशीनुसार पीक नियोजन करावे.


डॉ. मधुकर बेडीस, ९८५०७७८२९०
डॉ. योगेश्‍वर पाटील, ९४२०३८७३३३
कैलास महाले, ८४५९३१५७३८
(कृषी तंत्र विद्यालय, जळगाव अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

पीक नियोजन

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top