कृषी महाराष्ट्र

Onion Market : आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा ! वाचा संपूर्ण

Onion Market : आवक कमी झाल्याने कांद्याच्या दरात सुधारणा ! वाचा संपूर्ण

 

Market Rate : आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही कापूस दरात चढ उतार कायम आहेत. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या दरातील तफावत जास्त दिसते. तर बाजारातील कापूस आवकही सध्या सरासरीपेक्षा अधिक आहे. मग आज कापसाला बाजार समित्यांमध्ये आणि वायद्यांमध्ये काय भाव मिळाला? कापसाची आवक किती झाली होती? जाणून घेऊया

1. देशात सोयाबीनचे दर स्थिर

देशातील बाजारात सोयाबीनचे दर वाढण्याचे नावच घेईना. सोयाबीनचा बाजार मागील दोन महिन्यांपासून ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात काहीसे चढ उतार सुरु आहेत. पण देशात खाद्यतेलाचे वाढलेले साठे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड दरावरील दबाव, यामुळे देशात सोयाबीन स्थिर आहे. सोयाबीनचा बाजार पुढील काळातही स्थिर दिसू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. Market Bulletin

2. कांद्यामध्ये दरवाढ कायम

बाजारातील कांद्याची आवक कमी झाल्यानंतर दरात काहीशी सुधारणा दिसून येत आहे. कांद्याचे भाव आता उत्पादन खर्चाच्या पातळीवर आल्याचे शेतकरी सांगत आहेत. कांद्याचे भाव आज १ हजार २०० ते १ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान होते. काही राज्यांमध्ये भाव यापेक्षा जास्त आहेत. पण त्या राज्यांमध्ये कांदा उत्पादन कमी होते. परराज्यातून आवक होत असल्याने दर अधिक दिसतात. पण कांद्याच्या भावातील दरवाढ कायम राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.

3. टोमॅटोचे भाव तेजीत

देशातील बाजारात टोमॅटो आवक खूपच कमी होत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात आवक सरारीच्या तुलनेत केवळ ३० टक्क्यांपर्यंत होत आहे. मात्र टोमॅटोची मागणी टिकून आहे. त्यामुळे टोमॅटोला प्रतिक्विंटल ५ हजार ते ६ हजार रुपये भाव मिळत आहे. टोमॅटोची बाजारातील आवक लगेच वाढण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. Market Bulletin

4. डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट

चालू हंगामात डाळिंबाच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यामुळे बाजारातील आवकही कमी आहे. परिणामी डाळिंबाचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच टिकून आहेत. डाळिंबाला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार ते ७ हजार रुपये भाव मिळत आहे. तर गुणवत्तापूर्ण डाळिंबाचे भाव प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत आहेत. डाळिंबाचे भाव पुढील काळातही कायम राहू शकतात, असा अंदाज अभ्यासक व्यक्त करत आहेत.

5. देशातही कापूस दरात चढ उतार कायम

आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातही कापूस दरात चढ उतार कायम आहेत. सकाळ, दुपार आणि संध्याकाळच्या दरात दरातील तफावत जास्त दिसते. आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे दुपारपर्यंत ८०.६५ सेंट प्रतिपाऊंडवर होते. इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंजवरील वायदे सकाळी वाढलेले होते. पण दुपारी वायद्यांमध्ये जवळपास एक टक्क्यांची नरमाई आली होती. तर देशातील वायद्यांमध्येही हीच स्थिती दिसून आली. एमसीएक्सवरील वायदे दुपारी ८० रुपयांनी नरमाले होते.

वाद्यांमध्ये कापसाला प्रतिखंडी ५६ हजार ५४० रुपये भाव होता. बाजार समित्यांमध्येही काहीसे संमिश्र चित्र होते. देशातील विविध भागांमध्ये कापसाल ६ हजार ६०० रुपयांपासून ते ७ हजार ३०० रुपयांपर्यंत दर मिळाला. कापसाच्या दरातील चढ उतार आजही कायम दिसले. तर बाजारातील कापूस आवक आज ३२ हजार गाठींच्या दरम्यान होती. आजची आवक सरासरीपेक्षा सात पटींनी जास्त होती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

कापसाचे भाव मागील तीन महिन्यांपासून दबावातच आहेत. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारातही दरावरील दबाव कायम आहे. त्यामुळे शेतकरी कापसाची विक्री करत आहेत.आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस, सूत आणि कापडाला कमी उठाव आहे. यामुळे दरावर दबाव दिसतो. यामुळे देशातील कापूस दर पुढील काही काळ या पातळीदरम्यान दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

source:agrowon

Onion Market

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top