कृषी महाराष्ट्र

Tomato Rate : टोमॅटो, हळदीच्या भावात तेजी कायम ! वाचा सविस्तर

Tomato Rate : टोमॅटो, हळदीच्या भावात तेजी कायम ! वाचा सविस्तर

 

फ्यूचर्स किमती : सप्ताह १ ते ७ जुलै २०२३

यंदा उशिरा पाउस सुरू झाल्यामुळे देशातील खरीप लागवडीवर परिणाम झाला आहे. या सप्ताहात मूग वगळता सर्वच पिकांच्या किमती वाढल्या. जून, जुलै महिन्यांत मुगाची आवक गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे. हळद व टोमॅटोच्या किमती तेजीत आहेत. मक्याचे भाव वाढत असून ते जर हमीभावापेक्षा अधिक झाले, तर हेजिंगचा विचार करावा.

मक्याकरिता सध्या जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी NCDEX मध्ये व्यवहार करता येतील. कापसाकरिता MCX मध्ये जुलै, ऑगस्ट, नोव्हेंबर व जानेवारीसाठी व्यवहार करता येतील. हळदीकरिता ऑगस्ट, ऑक्टोबर व डिसेंबर डिलिव्हरीसाठी NCDEX मध्ये व्यवहार करता येतील.

७ जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत :

कापूस/कपाशी

MCX मधील कापसाचे स्पॉट (राजकोट, यवतमाळ, जालना) भाव गेल्या सप्ताहात २ टक्क्यांनी घसरून रु. ५५,६६० वर आले होते. या सप्ताहात ते ०.५ टक्क्याने वाढून रु. ५५,९६० वर आले आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स भाव रु. ५६,५४० वर आले आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. ५६,७०० वर आले आहेत. ते सध्याच्या स्पॉट भावापेक्षा १.३ टक्क्याने अधिक आहेत. कापसाचे भाव घसरण्याचा कल आहे. आवकही आता कमी होत आहे.

कपाशीचे स्पॉट भाव (प्रति २० किलो) गेल्या सप्ताहात रु. १,४०१ वर आले होते. या सप्ताहात ते याच पातळीवर कायम आहेत. नोव्हेंबर फ्यूचर्स रु. १,४८० वर आले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा ५.६ टक्क्यांनी अधिक आहेत. कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ६,६२० व लांब धाग्यासाठी रु. ७,०२० आहेत.

मका

NCDEX मधील रब्बी मक्याच्या स्पॉट किमती (गुलाब बाग) गेल्या सप्ताहात १.९ टक्क्याने घसरून रु. १,९३८ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.५ टक्क्याने वाढून रु. १,९५० वर आल्या आहेत. फ्यूचर्स (ऑगस्ट डिलिव्हरी) किमती रु. १,९६६ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. १९९१ वर आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या २.१ टक्क्यांनी अधिक आहेत. मक्याचा हमीभाव रु. २,०९० आहेत. कमी उत्पादनाच्या भीतीमुळे मक्याच्या किमती वाढत आहेत.

हळद

NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात ४.२ टक्क्यांनी वाढून रु. ८,६१० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुनः ५.२ टक्क्यांनी वाढून रु. ९,०५६ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्यूचर्स किमती रु. ९,७४२ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्यूचर्स किमती रु. १०,२३८ वर आल्या आहेत; स्पॉट भावापेक्षा त्या १३ टक्क्यांनी जास्त आहेत. डिसेंबर भावसुद्धा (रु. १०,७३४) चांगला आहे.

चालू वर्षी हळदीचे उत्पादन कमी झालेले आहे; पुढील वर्षीसुद्धा ते कमी असेल असा अंदाज आहे. यामुळे हळदीच्या किमतीत तेजी आहे. हळदीच्या स्पॉट व फ्यूचर्स किमतींमध्ये बराच मोठा फरक आहे. त्यामुळे फ्यूचर्स मार्केटमध्ये विकण्यासाठी अजूनही अनुकूल संधी आहे. Tomato Rate

हरभरा

हरभऱ्याच्या स्पॉट (अकोला) किमती गेल्या सप्ताहात ५.१ टक्क्यांनी वाढून रु. ५,१५० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या रु. ५,१५० वर स्थिर आहेत. चालू हंगामासाठी हमीभाव रु. ५,३३५ आहे. सध्याचे भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. या महिन्यातील हरभऱ्याचे भाव रु. ४,८०० ते रु. ५,२०० दरम्यान आहेत.

मूग

मुगाची स्पॉट किमत (मेरटा) गेल्या सप्ताहात वाढत्या आवकेमुळे ३.८ टक्क्यांनी घसरून रु. ७,५०० वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्क्याने वाढून रु. ७,४५० वर आली आहे. मुगाची आवक गेल्या पाच सप्ताहांत वाढू लागली आहे. गेल्या वर्षी ती जुलैमध्ये सर्वाधिक होती. मुगाचा हमीभाव रु. ८,५५८ आहे. Tomato Rate

सोयाबीन

सोयाबीनच्या स्पॉट किमती घसरत आहेत. गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किमत (अकोला) रु. ५,१५१ वर आली होती. या सप्ताहात ती १ टक्का वाढून रु. ५,२०२ वर आली आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ४,६०० आहे.

तूर

तुरीची स्पॉट किंमत (अकोला) गेल्या सप्ताहात १.६ टक्क्याने घसरून रु. ९,३०१ वर आली होती. या सप्ताहात ती ०.७ टक्का वाढून रु. ९,३६७ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ७,००० आहे. तुरीच्या भावात तेजी आहे. आवक कमी आहे. पुढील वर्षीचे उत्पादन अनिश्‍चित आहे.

टोमॅटो

गेल्या सप्ताहात टोमॅटोची स्पॉट किमत (जुन्नर, नारायणगाव) रु. ४,२५० वर आली होती. या सप्ताहात ती पुन्हा वाढून रु. ६,२५० वर आली आहे. साप्ताहिक आवक कमी होत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. टोमॅटोचा दर्जाही समाधानकारक नसल्याचे खरेदीदारांचे मत आहे.

(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)

source:agrowon

Tomato Rate

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top