कृषी महाराष्ट्र

Weather Forecast : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज ! वाचा संपूर्ण

Weather Forecast : विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज ! वाचा संपूर्ण

 

Weather Update Pune : कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १०) तळ कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्ट्याचा पश्चिम भाग दक्षिणेकडे कायम असून, पूर्व भाग काहीसा उत्तरेकडे सरकला आहे. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या जैसलमेर, अजमेर, शिवपूरी, सिधी, दोल्टोंगज, शांती निकेतन ते मनिपूरपर्यंत सक्रिय आहे.

पश्चिम किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरातपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कायम आहे. मध्य राजस्थान आणि परिसरावर समुद्रसापाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. Weather Forecast

कोकण, घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. मात्र विदर्भात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. १०) तळ कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. Weather Forecast

आज (ता. १०) राज्यातील पावसाचा इशारा दर्शवणारा नकाशा (स्रोत : हवामान विभाग) :

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ चंद्रपूर, गडचिरोली.

शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पडलेला पाऊस, मिलीमीटर मध्ये (स्रोत – हवामान विभाग) :

कोकण :

पेण ८०, दोडामार्ग, मुरबाड प्रत्येकी ५०, जव्हार, कणकवली, वैभववाडी, माथेरान प्रत्येकी ५०.

मध्य महाराष्ट्र :

गगणबावडा ८०, राधानगरी ७०, इगतपूरी, शाहूवाडी प्रत्येकी ६०, यावल, महाबळेश्वर प्रत्येकी ५०, चंदगड, लोणावळा, आजरा प्रत्येकी ४०, त्र्यंबकेश्वर, वेल्हा, पौड, तळोदा, हर्सूल, पाटण प्रत्येकी ३०.

मराठवाडा :

मराठवाडा ३०, भोकरदन, उदगीर, चाकूर प्रत्येकी २०.

विदर्भ :

बह्मपुरी, नागभिड प्रत्येकी ९०, भिवपूरी, देसाईगंज, अरमोरी प्रत्येकी ८०, कुरखेडा, सिंदेवाही, कुही, मोहाडी प्रत्येकी ७०, लाखंदूर, पवनी, हिंगणा, उमरेड, साकोली, देवरी, तुमसर, लाखणी, चिमूर प्रत्येकी ६०, बल्लारपूर, गोंदिया, तिरोडा, सालकेसा, मुलचेरा, धामणगाव रेल्वे, आमगाव, नागपूर, कोर्ची, सडक अर्जूनी, सेलू, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, कामठी, मोरगाव अर्जूनी प्रत्येकी ५०

घाटमाथा :

कोयना १२०, शिरगाव, दावडी ८०.

source:agrowon

Weather Update, Weather Update In Maharashtra, Weather Forecast, आजचा हवामान अंदाज

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top