कृषी महाराष्ट्र

Crop Insurance : शेतीपिकांचे एक रुपयांत विमा उतरवणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ! वाचा सविस्तर

Crop Insurance : शेतीपिकांचे एक रुपयांत विमा उतरवणारे महाराष्ट्र एकमेव राज्य ! वाचा सविस्तर

 

Radhakrushna Vikhe Patil : नगर ः एक रुपयात पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) ही राज्‍य सरकारने सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरेल, अशी योजना करणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूलमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.

राज्‍य सरकारने खरीप व रब्‍बी हंगामाकरिता सुरू केलेल्‍या एक रुपयात पीकविमा योजनेच्या प्रसारासाठीच्या प्रचाररथाचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्‍या हस्ते लोणी (ता. राहाता) येथे पूजन करून व हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. या वेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, की यापूर्वी पीकविमा योजनेचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागला, शेतकऱ्यांची आर्थिक लूट आणि फसवणूक झाली. या परिस्थितीमध्‍ये बदल करण्‍यासाठी राज्‍य सरकारने शेतकऱ्यांकरिता एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली. त्‍याची अंमलबजावणी आता यंदाच्‍या खरीप हंगामापासून सुरू आहे. या योजनेचा कोणताही आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडणार नाही. Crop Insurance

शासनच आता विम्‍याची रक्‍कम भरणार आहे. या योजनेत सहभाग घेण्‍यासाठी शेतकऱ्यांनी स्‍वत:हून आता पुढे यावे. हवामानातील बदल हे कृषी क्षेत्रापुढे मोठे आव्‍हान असल्‍याने आपल्‍या पीक उत्‍पादनाची सुरक्षितता वाढविण्‍यासाठी विमा योजनेचे संरक्षण कवच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयांमध्‍ये संपर्क साधून या योजनेची माहिती घ्‍यावी. जिल्‍ह्यातील कृषी आधिकाऱ्यांनी गावपातळीवर जाऊन या योजनेचा प्रसार आणि प्रचार करावा. Crop Insurance

या पीकविमा योजनेत सहभाग घेण्‍यासाठी ३१ जलै २०२३ ही अंतिम तारीख असून, शेतकऱ्यांनी आपले अर्ज दाखल करण्‍यासाठी आपले सरकार सेवा केंद्रामध्‍ये सुविधा उपलब्‍ध करण्‍यात आली असून, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयातही संपर्क साधता येईल. शेतकऱ्यांसाठी अशी योजना राबविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. सरकार शेतकऱ्यासांठी काम करत आहे, असे विखे म्हणाले.

source:agrowon

Crop Insurance

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top