नवीन विहीर, गोठा हवाय, मात्र ग्रामपंचायत अर्ज घेत नाही, तक्रार कशी नोंदावी ? वाचा संपूर्ण
नवीन विहीर
MGNREGA Portal | ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळून त्यांचं जीवनमान उंचवावं यासाठी मनरेगा ही योजना चालू करण्यात आली. या योजनेचा ग्रामीण भागातील जनतेला खूप लाभ झाला. मात्र यातून बऱ्याच तक्रारीही येऊ लागल्या. काही वेळा या तक्रारींची दखल घेतली गेली, काही वेळा या तक्रारी डावलण्यात आल्या. तर काही वेळा अर्ज डावलण्यात येतात. किंवा अर्ज दाखल करून घेतला जात नाही. मात्र आता या आणि इतर तक्रारींची दखल सर्रास घेतली जाईल. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च रोजी मनरेगा, महाराष्ट्र या वेबसाईटचं लोकार्पण केलं आहे. या माध्यमातून मनरेगा संदर्भातील ग्रामीण लाभार्थ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात येईल.
काय आहे मनरेगा
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना ही योजना ग्रामीण भागातील जनतेला वर्षातील किमान शंभर दिवस रोजगार उपलब्ध व्हावा, या कामातून झालेल्या आर्थिक कमाईतून त्यांचं जीवनमान उंचवावं अशी ही योजना आहे. 2 फेब्रुवारी 2006 रोजी ही योजना सुरू झाली होती. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मोठ्या प्रमाणात मिळाला होता.
अशी आहे वेबसाईट
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 14 मार्च रोजी महाराष्ट्र मनरेगा साठीच्या वेबसाईटचं लोकार्पण केलं. या वेबसाईटवरून मनरेगाची सध्या चालू असलेली कामं, डॅशबोर्ड, विविध तक्रारी इत्यादींची माहिती मिळवता येणार आहे. तसेच पूर्वी दाखल केलेल्या तक्रारींचं निवारण झालं आहे की नाही हेही तपासता येणार आहे. अशा रीतीने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना या वेबसाईटच्या माध्यमातून फायदा होणार आहे. नवीन विहीर
source:mieshetkar