शेतीमध्ये जिवामृत तंत्रज्ञान महत्वाचे : वाचा संपूर्ण माहिती
शेतीमध्ये जिवामृत तंत्रज्ञान
अनेकदा आपन जिवामृताचा वापर आपल्या शेतात करतो. त्याचे कार्य काय आहे व वापर कसा करावा व का करावा त्यामुळे आज सर्व प्रश्नांचे उत्तर या लेखात मिळणार आहे आमच्या घरी वडिलोपार्जित जनावरें पाळली जात आहे.ती परंपरा आम्ही पुढे जपत आहे कारण गायीचे निघणारे दुध व त्यापासून दही व तुप हे सर्वात आवडते पदार्थ आहेत मी नेहमी गोमुत्र साठवुन शेतीत विविध प्रयोग करत असतो. गायीच्या शेणाचा व गोमुत्राचा वापर करुन जैविक शेतीचा प्रयोग मि माझ्या शेती वर केलेला आहे. या अनुभवातुन एक गोष्ट शिकलो एखाद्या तंत्राचे ताबडतोब फायदे मिळतात म्हणुन कोणत्याही शास्त्रीय अभ्यासा शिवाय ते तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरणे म्हणजे एक धुळफेक म्हणावं लागेल.
आज युवा पिढीसमोर शेती साठीआलेले जैविक तंत्रज्ञान खरे पाहिले तर खुप जुने आहे पण हे त्यांना कोणीतरी सांगायची गरज आहे.जिवाणुंच्या वाढीसाठी बनविलेली स्लरी म्हणजे जिवामृत, स्लरी तयार करायच्या तिसऱ्या दिवसानंतर चिलेशन होण गरजेच आहे. म्हणजे गायीच्या शेणाचे ७ दिवसांत आबंवन किंवा कम्पोस्ट करुन त्याद्वारे जैविक मॅटर व बायोमास बनविने हे खरे तंत्र आहे. याप्रक्रियेमध्ये तयार होणारे उपयुक्त जिवाणु व फंगस द्रव भाग जेवढे महत्वाचे असतात त्याहुन ते ज्या घन पदार्थमध्ये वाढले तो ही जमिनीत सोडने ते ही तितकेच महत्वाचे आहे कारण सध्याची माति ही जिवाणुंसाठी प्रतिकूल आहे. हे सर्व माहिती आहे. (Biodiversity Technology)
मग अशा परिस्थितित केवळ त्यातला द्रव पदार्थ गाळुन तो द्रवपदार्थ ड्रिपमधुन जमिनित सोडल्याने किति दिवस त्यांचे परिणाम टिकुन रहातिल याबाबत शंका आहे असते कारण त्यातील जिवाणु तात्पुरता प्रभाव देऊन लवकरच निष्क्रिय होऊन जातात त्यांना अन्न देण्यासाठी वेगळे झालेले असते !म्हणून तर जीवामृत पुन्हा पुन्हा सोडावं लागते. यावरुन जीवामृत जमिनीत सोडने किति गमतिशिर प्रकार आहे हे आपल्या लक्षात येइल. “जीवामृत ” हे भारतीय शेती चा पारंपरिक प्रकार आहेत. ते काही नविन नाहीत उलट त्यांचा वरिलप्रमाणे चुकिच्या प्रकारे प्रचार होत असताना दिसतो आहे. शेतीमध्ये जिवामृत तंत्रज्ञान
मला अनेकशेतकरी भेटले ज्यांनी रासायनिक शेतीकडून जीवामृत कडे वळले, पहिल्या वर्षी खर्च खुप कमी आला भरपूर उत्पन्न निघाले पण त्यानंतर दरवर्षी उत्पन्न वेगाने घटत गेले. साधे शास्त्रीय कारण आहे, बायोमास वाढला व ऑरगॅनिक मॅटर कमी झाला तर जिवाणु झाडाकडून व माती मधून कर्ब ग्रहण करणार साहजिकच CN रेशो बिघडला नत्र खुप वाढुन जाते व शाखिय वाढ होत रहाते. त्यामुळे शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे कि कोणतेही नविन तंत्रज्ञान अभ्यासपुर्वक वापरले तर त्याचे फायदे व तोटे पाहुन नियोजन करता आले पाहिजे.
आता जिवामृत या स्लरीसाठी गायी चे शेण व गौ मुत्र वापरले जाते त्यात हजारों जिवाणुंचा समावेश असतो, तसेच वडाखालची माती वापरली जाते कारण त्यात गांडुळांची अंडबिजे असतात कारण वड हे एकमेव असे वृक्ष आहे जे भर उन्हाळ्यात पक्षांना फळे व निवारा देते त्यांची विष्टा हि गांडुळांना अन्न म्हनुन उपयोगी पडते व घनदाट सावलीमध्ये गारवा टिकुन रहातो व वर्षभर गांडुळे सक्रिय असतात, जिथे गांडुळ असते तिथली माती जिवाणु ने समृद्ध असते.गुळ वापरतात कारण त्यातील ग्लुकोज जिवाणुंसाठी उर्जा म्हनुन काम करते.कडधान्याच्या डाळीचे पिठ वापरतात कारण त्याद्वारे विविध प्रोटीन चा पुरवठा त्यामुळे होतो. (Biodiversity Technology in Agriculture)
जिवाणुंना गुळा मधुन ग्लुकोज मिळतो व जिवाणुंचा काउंट हा वेगाने वाढतो !त्यांच्या स्त्रावातुन येणाऱ्या इंझाइम्स मुळे रासायनिक व सेंद्रिय पदार्थांचे चिलेशन होते व मातीचा पि एच नॅार्मल होतो ह्युमस हा जिवाणुंच्या अन्नसाखळीचा आधारस्तंभ आहे! कर्बरस व पोषक पदार्थ झाडांच्या मुळांकडुन मिळो किंवा सेंद्रिय पदार्थातुन ह्युमस मिळो, पुरेसे पोषण मिळाले तर त्यांची संख्या काही मिनिटांत दुप्पट होते !दुधाचे काही तासात दही बनते ते याच नियमाने जिवाणुंची संख्या वाढते. म्हणजे जर जमिनित ह्युमस किंवा सेंद्रिय कर्ब भरपूर असेल तर जिवाणुंची नैसर्गिक पणे चांगली वाढ होते व ते टिकुन रहातात.
परिणामी जमिनीचे आरोग्य चांगले रहाते व खतांचे अपटेक वेगाने होते!जर निकस चारा खाऊन तयार झालेल्या शेणखतापासुन स्लरी बनत असेल तर अशा निकस सेंद्रिय घटकांपासुन बनणारी स्लरी जिवाणुंना कितपत पोषण देऊ शकेल हा एक संशोधनाचा भाग आहे.जिवामृत चा वापर करने चांगले आहे परंतु पोषनासाठी केवळ त्यावर अवलंबुन रहाणे त्याऐवजी खतांच्या स्लरी करने फायदेशिर ठरु शकते.जिवाणुंच्या द्वारा निर्मित अनेक घटकांपैकी हृयुमस अत्यंत महत्वपूर्ण पदार्थ आहेत. जे वनस्पतिच्या अन्ननिर्मितिस आवश्यक मुलद्रव्यांची उपलब्धता करणेसाठी महत्वपूर्ण असे चिलेशनचे कार्य करतात.परंतु मोठ्या प्रमाणात हे घटक उपलब्ध होण्यासाठी काही हजार किलो सेंद्रिय पदार्थांची गरज असते.
जिवाणु द्वारा ५ % ह्युमिक अॅसिड व ५% फुल्विक अॅसिड उपलब्ध होते नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ पुरवठा करने व जमीन सजिव करने हे काम त्या घटकांचे असते पुढच्या पिढिने आनंदाने शेतिकडे वळावे असे वाटत असेल तर त्यांना शास्त्रीय व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देने आवश्यक आहे. जे तंत्र सोयिस्कर व सुटसुटित असेल तर माती साठी अनमोल भेट आहे. मातितील पोषण अत्यंत संवेदनशील असत त्यामुळे कोणत्याही तंत्राचा वापर करताना तो विचारपूर्वक व पुढील पिकाचे नियोजन समोर ठेउन करावा.
मर रोग साठी शेतकरी सर्व उपचार करुन हतबल होतात, पैसा व आत्मविश्वास गमावला की जिवामृत तंत्राकडे वळतात! मग फक्त स्लरी सोडत राहातात जिवामृताची फवारणी करत रहातात, कोणताही शास्त्रीय विचार न करता! पहिल्या वर्षी छान रिजल्ट मिळतो व एकदा का मातितले स्टोरेज संपले की कारण ज्या एक एकर क्षेत्राला शेतकरी पिकाला तिन ते चार ट्रॅाली शेणखत व इतर सेंद्रिय खते टाकतो त्या एक एकरात २०० लिटर स्लरी तुन ४० किलो शेण व २ किलो गुळ व २ किलो दाळितुन कितिसे पोषण मिळणार हा हि अभ्यास आपन करायला हवा.
जर जिवामृत चा अतिरेक झाला असेल तर मातिसोबत झाडातिल कर्ब नत्र C N रेशो बिघडतो व मग तो दुरुस्त व्हायला ६ महिने लागतात. साध्या भाषेत सांगायचे झाले तर ,पातेल्यात दुध असेल तर विरजन टाकुन दही बनेल पण जर पातेल्यात दुधच नसेल तर विरजनाचा काय उपयोग!तसे स्लरी किंवा जिवामृत हे विरजन आहे.जमिनित पुरेसे सेंद्रिय किंवा रासायनिक घटक नसताना स्लरीचा वापर मुलद्रव्यांचे असंतुलन निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो परिणामी शेतीतिल आर्थिक गणित बिघडते व नुकसानाला दुसरा पर्याय शिल्लक रहात नाही.
जैवीक शेती करणारे शेतकरी या गोष्टीपासून अज्ञात आहेत की स्लरी व जीवमृतातील जिवाणूद्वारे निर्माण होत असलेल्या ह्यूमिक व् फुलविक घटकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घट झालीय की ते मातीची तर सोडाच साधी पिकांची तात्पुरती गरज भागवु शकत नाही .नैसर्गिक मार्गाने उपलब्ध झालेल्या ह्युमस हा नैसर्गिक व सुरक्षित आहे. नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार झालेले जंगलातील झाडे व प्राणी यांच्या अवशेषांचे कंपोस्ट म्हनजे मातीला मिळालेली टेक्नोलॉजी होय समृद्ध शेतीचा मंत्र, म्हणजे आज आपल्याला हरितक्रांती ची नाही तर मृदा क्रांती ची आवश्यकता आहे मंडळी
माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना देखील पाठवा.
source : krishijagran.com
शेतीमध्ये जिवामृत तंत्रज्ञान वापरा विषयी काही प्रश्न ?
जीवामृत ,जिवामृत,स्लरी (जीवामृत) महत्व शेतीमध्ये काय ?,जिवामृत तयार कसा करावा ?, जिवामृत फिल्टर, जिवामृत ठिबक द्वारे शेतात कसे द्यावे ?, जिवामृत कसे बनवावे ?, जिवामृत कसे बनवायचे ?, जिवामृत ठिबक द्वारे कसे द्यावे ?,पाटाच्या पाण्यातून द्या जिवामृत,पाटाच्या पाण्यातून कस द्यायच जिवामृत ?, जीवामृत तयार करणे ?, जीवामृत बनाने की विधि, जीवामृत कसे तयार करतात ?, जीवामृत कसे तयार करावे ?, जीवामृत प्लस ,जीवामृत कसे तयार करायचे ?, जीवामृत कसे तयार करावे ?