Crop Damage : ‘पीक नुकसानीची माहिती ७२ तासांत विमा कंपनीस कळवा’ ! कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन
Crop Damage : परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झालेल्या मंडलातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी स्थानिक आपत्ती (लोकल कॅलॅमिटी) या जोखीम बाबींअंतर्गत पीक नुकसानाची पूर्वसूचना (माहिती) नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत पीकविमा मोबाइल अॅपद्वारे ऑनलाइन किंवा विमा कंपनीच्या जिल्हा किंवा संबंधित तालुका कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. Crop Damage
जिल्ह्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीकडून पीकविमा योजना राबविली जात आहे. सततचा पाऊस व झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांनी विमा संरक्षित खरीप पिकांच्या नुकसानीची माहिती विमा कंपनीस Crop Insurance अॅपद्वारे द्यावी.
विमा संरक्षण घेतलेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती स्थानिक आपत्तीअंतर्गत नुकसानग्रस्त पिकांच्या छायाचित्रासह अपलोड करावी किंवा १८००-१०३-७७१२ या निःशुल्क (टोल फ्री) क्रमांकावर तक्रार नोंद करावी.
ऑनलाइन तक्रार नोंदवणे शक्य नसलेल्या शेतकऱ्यांनी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा किंवा तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह ही तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत नुकसानीची नोंद करणे आवश्यक आहे.
सध्या पिकाचे नुकसान हे अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झाले असल्याने हेच कारण नमूद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे. मूग व उडीद पिकांच्या बाबतीत Crop Stage – Cut & Spread म्हणजेच पोस्ट हार्वेस्टमध्ये (काढणीपश्चात) पीक नुकसानीची तक्रार फक्त शनिवार (ता. ३०) पर्यंत देऊ शकतात.
source: agrowon