कृषी महाराष्ट्र

Soybean Rate India : सोयाबीनला येणार अच्छे दिन ? अन्य देशातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता

Soybean Rate India : सोयाबीनला येणार अच्छे दिन ? अन्य देशातील सोयाबीन उत्पादन घटण्याची शक्यता

 

Soybean Rate India : अल् निनोमुळे देशातील अनेक राज्यात क्षमतेपेक्षा पाऊस कमी झाला. यामुळे अनेक राज्यातील खरीप पिकांची स्थिती चिंताजनक बनली आहे. दरम्यान सोयाबीन, भात, यासह अनेक कडधान्यांच्या पिकात घट होण्याची शक्यता आहे.

दरम्यान मागच्या सोयाबीनसह अन्य पिकांचे उत्पादन चांगले झाल्याने दर पडले होते. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ आली होती. यंदा मात्र उत्पादनच कमी होणार असल्याने सोयाबीनला चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

यंदाचा सोयाबीनचा हंगाम सुरू होण्यास काही दिवस बाकी आहेत. परंतु अद्यापही सोयाबीनचा दर पाच ते साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. मात्र, प्रमुख उत्पादक देश अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कमी पावसाचा फटका बसून, सोयाबीनचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे यंदा भारतीय सोयाबीनच्या मागणी, दरात देखील वाढ होण्याची शक्यता सोयाबीन ट्रेडर्सकडून वर्तवली जात आहे.

अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त उत्पादन भारतात घेतले जाते. दरम्यान अमेरिका तसेच ब्राझीलमधून होणारा सोयाबीनच्या पुरवठ्यामुळे भारतीय सोयाबीनला दर कमी मिळतो यामुळे पुरवठा दरावर प्रभाव पडत असतो. आता नवीन हंगाम तोंडावर असतानाच सोयाबीन बाजारभाव मात्र अद्यापही दबावाखाली आहे. Soybean Rate India

या हंगामात अमेरिकेमधील सोयाबीन पीक कमी निघणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. याही देशांनाही कमी पावसाचा फटका बसल्याने सोयाबीन पिकाचे उत्पादन घटणार आहे. यातूनच आतापासूनच अमेरिकेत सोयाबीनचा दर तेजीत आला आहे. याचदरम्यान, पामतेलानेदेखील दरात उसळी घेतली आहे. याचादेखील फायदा सोया तेलाला होत आहे.

सध्या सोयाबीन, सोयापेंड वायदे तेजीत आहेत. परंतु, देशातील बाजारभाव पाहिले, तर मात्र सोयाबीनचे दर हे प्रतिक्विंटल सरासरी साडेचार हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत होते. तसेच उद्योगातून हेच दर ५१०० ते ५२५० रुपयांच्या दरम्यान राहिले आहेत.

तसेच खाद्यतेल बाजारात सूर्यफूल तेलाचे भाव वाढले आहेत. याचा परिणाम हा सोयाबीन दरावर निश्चितपणे होणार आहे. प्रतिकूल नैसर्गिक वातावरणामुळे ब्राझील आणि अमेरिकेतील सोयाबीन पुरवठ्याबाबत चित्र काहीसे सकारात्मक नाही. या दोन्ही देशात सोयाबीन पिकाला कमी पावसाचा फटका बसत आहे.

source: agrowon

Soybean Rate India

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top