कृषी महाराष्ट्र

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर

Jowar Rate : ज्वारीला बारामतीत मिळाला प्रति क्विंटल ६०५१ रुपये दर

 

Pune News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. १०) ज्वारीला प्रति क्विंटल ६०५१ रुपये इतका उच्चांकी दर मिळाला. माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील शेतकरी हणमंत तरटे यांच्या ज्वारीला हा उच्चांकी दर मिळाला. ज्वारीची आवक कमी असल्याने सध्या ज्वारीला जादा दर मिळत आहे.

चांगल्या दर्जाच्या गव्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये इतका दर मिळाला. मक्याला २७७१ रुपये प्रति क्विंटल, बाजरी, हरभरा, तूर, उडीद या शेतीमालाची आवक होऊन बाजरीला प्रति क्विंटल २५०१, हरभरा ४७८१, तूर ९०११, उडीद ८१४० व खपली गव्हासाठी २५२० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. Jowar

खरेदीदार म्हणून आवारातील बाळासाहेब फराटे, महावीर वडूजकर, मिलिंद सालपे, शशिकांत सालपे, जगदीश गुगळे, दीपक मचाले, अशोक भळगट, सतीश गावडे यांनी सहभाग घेतला.

बाजार आवारात शेतीमालास चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल स्वच्छ व ग्रेडिंग करून आणल्यास आणखी चांगला दर मिळेल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सुनील पवार व उपसभापती नीलेश लडकत यांनी दिली. Jowar

दरम्यान, ज्वारीची आवक माण, दहिवडी या तालुक्यांतून आहे. बारामतीसह इंदापूर, दौंड, फलटण या तालुक्यांतून शेतीमालाची आवक होते. मुख्य बाजार आवारात ग्रेडिंग मशिन असल्याने शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, यासाठी आणखी एक नवीन मशिन बसविण्याचा समितीचा मानस आहे. शेतकऱ्याचा शेतीमाल कमी वेळेत जादा स्वच्छ होईल.

त्यामुळे त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होईल. तसेच समितीने आवारात शेतीमाल आल्यानंतर प्रथम वजनानंतर लिलाव अशी सुविधा असल्याने लगेच पेमेंट मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बारामती बाजार आवारात विक्रीस आणावा, असे आवाहन सचिव अरविंद जगताप केले.

source:agrowon

Jowar Rate

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top