कृषी महाराष्ट्र

Wheat Varieties : उशीरा पेरणीसाठी कमी पाण्यात येणारे गव्हाचे वाण कोणते व त्याबद्दल सविस्तर माहिती

Wheat Varieties : उशीरा पेरणीसाठी कमी पाण्यात येणारे गव्हाचे वाण कोणते व त्याबद्दल सविस्तर माहिती

 

Wheat Varieties : महाराष्ट्रात दरवर्षी उशिरा लागवडीचे क्षेत्र सुमारे ३० टक्के असते. यंदा मान्सून उशीरा आल्याने खरीप पिकांची पेरणीही उशीरा झाली. त्यामुळे रबी हंगाम सुरु झाला तरी खरीप पिकांची काढणी सुरुच आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता रबी हंगामात येणाऱ्या पिकांच्या कमी कालावधीत तयार होणाऱ्या वाणांची निवड करण गरजेचे आहे. रबी हंगामातील बागायती गव्हाच्या उशिरा पेरणीची शिफारस ही १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर अशी आहे. या कालावधीसाठी अनूकुल असणाऱ्या वाणांची माहिती घेऊया. Wheat Varieties

गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्या वेळी २५ अंश सेल्सिअस इतके तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन दाण्याचे वजन वाढते. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हास अनुकूल वातावरण मिळत नसल्याने उत्पादनात घट येते.

नोव्हेंबरचा शेवटचा पंधरवडा ते डिसेंबरचा पहिला पंधरवडा म्हणजेच १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या काळात बागायती गव्हाची उशीरा पेरणी केली जाते. वास्तविक १५ नोव्हेंबरनंतर पेरणीसाठी होणाऱ्या दर पंधरवड्याच्या उशिरासाठी हेक्टरी २.५ क्विंटल (एकरी एक क्विंटल) उत्पादन घटते. गहू पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते.Wheat Varieties

उशीरा पेरणीसाठी वाण

१) एमएसीएस-६२२२

महाराष्ट्रातील आघारकर संशोधन संस्थेने विकसित केलेला गव्हाचा सरबती वाण एमएसीएस-६२२२ वाण वेळेवर पेरणी केल्यास सरासरी उत्पन्न ४८ क्विंटल प्रतिहेक्टर देतो व अनुकूल परिस्थितीत या वाणाची कमाल उत्पादन क्षमता ही ६० क्विंटल प्रती हेक्टर इतकी आहे. हा वाण उशिरा पेरणीसाठी (१ ते १५ डिसेंबर) व दोन ते तीन पाण्यांच्या पाळ्यामध्ये सुद्धा चांगला प्रतिसाद देतो.

हा वाण तांबेरा प्रतिकारक, मोठा दाणा, पाव व चपातीसाठी उत्तम आहे. संस्थेच्या होल, बारामती येथील प्रायोगिक प्रक्षेत्रावर, बदलत्या हवामानात, वेगवेगळ्या तारखांना केलेल्या पेरणीचे निष्कर्षही उत्तम असून, अन्य वाणाच्या तुलनेमध्ये एमसीएस ६२२२ चे उत्पादन जास्त असल्याचे दिसून आले आहे.

२) फुले समाधान

फुले समाधान म्हणजेच एन.आय.ए.डब्लू १९९४ हा सरबती वाणदेखील बागायती वेळेवर व उशिरा पेरणीसाठी महाराष्ट्रात प्रसारित केलेला आहे.

त्याचे वेळेवर पेरणीतील उत्पादन ४६.१२ क्विंटल प्रतिहेक्टर, तर उशिरा पेरणीखाली उत्पादन ४४.१३ क्विंटल/हेक्टर मिळते.

माहिती आणि संशोधन – आघारकर संशोधन संस्था, पुणे

Wheat Varieties

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top