कृषी महाराष्ट्र

Maize Production : मक्याची आवक बाजारात कशी सुरु आहे ? वाचा सविस्तर

Maize Production : मक्याची आवक बाजारात कशी सुरु आहे ? वाचा सविस्तर

 

Market Bulletin : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव पुन्हा कमी झाला आहे. सोयाबीनच्या भावाने १२.१२ डाॅलर प्रतिबुशेल्सची पातळी गाठली. तर सोयापेंडचा भाव कमी होऊन ३६० डाॅलर प्रतिबुशेल्सवर होता. देशातील भाव आजूनही कमीच आहेत. सोयाबीनला आजही ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

देशातील भावपातळी जागचे हालताना दिसत नाही. तर बाजारातील आवक सरासरीप्रमाणे होत आहे. बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली. कापसाचे वायदे ८२.३१ सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव वाढत असताना देखील देशातील भावपातळी मात्र वाढताना दिसत नाही. कापसाचे भाव आजही ६ हजार ६०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान होते.

कापसाची आवक आजही १ लाख ८० हजार गाठींच्या दरम्यान झाली होती. कापसाचे भाव कमी असतनाही बाजारातील आवक चांगली असल्याने दरावरील दबाव कायम दिसतो. ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. Maize Production

टोमॅटोच्या भाव मागील दोन आठवड्यापासून काहीसे नरमलेले आहेत. बाजारातील टोमॅटोची आवक मागील काही दिवसांपासून कमी जास्त होताना दिसते. पण आवकेत मोठी वाढ नाही. तरीही बाजारात टोमॅटोच्या भावावरील दबाव कायम आहे. सध्या टोमॅटोला प्रतिक्विंटल सरासरी १ हजार २०० ते १ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहेत.

मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोचा भाव कमीच दिसतो. टोमॅटोची आवक आणखी काही दिवस चांगली राहू शकते. बाजारातील आवक कमी झाल्यानंतर बाजारालाही आधार मिळू शकतो, असा अंदाज टोमॅटो बाजारातील व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत.

मक्याच्या भावाला चांगला दिसतो. देशातील मक्याचे उत्पादन यंदा घडलेले आहे. तर मक्याला पोल्ट्री आणि इथेनाॅलसाठी मागणी दिसते. यामुळे मक्याच्या भावात मागील दोन आठवड्यामध्ये क्विंटलमागे ५० रुपयांची वाढ दिसून येत आहे. Maize Production

सध्या मक्याला प्रतिक्विंटल सरकारी २ हजार २०० ते २ हजार ४०० रुपयांचा भाव मिळत आहे. यापुढील काळात मक्याला मागणी वाढून मक्याचे भाव आणखी वाढू शकतात, असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव दबावातच आहेत. सरकारने थेट ग्राहकांना डाळ विक्री सुरु केल्याचा बाजारावरच दबाव दिसून येत आहे. हरभऱ्याचा भाव मागील काही आठवड्यांपासून नरमलेला आहे. ऐन आवकेचा हंगामात २०२३ मध्ये दिसला होता त्या पातळीवर अनेक ठिकाणी भाव पोचला आहे. सध्या हरभऱ्याला ४ हजार ७०० ते ५ हजार ४०० रुपयांच्या दरम्यान भाव आहे.

तर हमीभाव ५ हजार ४४० रुपयांपेक्षा हे भाव खूपच कमी आहेत. तर यंदा हरभरा लागवडही कमी झाली. पण सरकार बाजारावर दबाव ठेऊन आहे. त्यामुळे हरभरा बाजार उत्पादन किती होते यावर अवलंबून असेल, असा हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Maize Production

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top