कृषी महाराष्ट्र

Monsoon Update : मॉन्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार !

Monsoon Update : मॉन्सून लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार !

 

Latest Monsoon Update : अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळामुळे मॉन्सूनच्या प्रवाहांना बळकटी मिळाली आहे. चक्रीवादळ उत्तरेकडे सरकताच कर्नाटकच्या किनारपट्टीवर मॉन्सूनने प्रगती केली आहे. गोव्याच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाटकमधील कारवारपर्यंत मॉन्सूनने मजल मारली आहे.

उद्यापर्यंत (ता. १२) गोवा आणि महाराष्ट्रात मॉन्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

मॉन्सूनने गुरुवारी (ता. ८) देशाच्या मुख्य भूमीचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये हजेरी लावली. केरळच्या बहुतांश भागासह दक्षिण तमिळनाडूमध्ये मॉन्सूनने वाटचाल केली. तर शनिवारी (ता.१०) मॉन्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनने धडक दिली आहे.

मॉन्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

वाऱ्यांच्या प्रगतीस पोषक हवामान असल्याने उद्या (ता. १२) मध्य अरबी समुद्र, कर्नाटकचा आणखी काही भाग, गोवा आणि महाराष्ट्र, तमिळनाडूच्या आणखी काही भागांत मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. तर बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह संपूर्ण पूर्वोत्तर राज्य, पश्चिम बंगालचा हिमालयाकडील भाग आणि सिक्कीम राज्यात मॉन्सून प्रगती करण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. Monsoon Update

थोडक्यात महत्त्वाचे…

– मॉन्सूनची कर्नाटकमधील कारवारपर्यंत प्रगती

– पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात मॉन्सूनची धडक

– वाऱ्यांच्या प्रगतीस पोषक हवामान

– अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम

– अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्यास सुरूवात

– महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्राला भरती

– बंगालच्या उपसागरात, म्यानमार किनाऱ्यावर कमी दाब क्षेत्र ठळक

चक्रीवादळाची तीव्रता कायम

अरबी समुद्रातील ‘बिपॉरजॉय’ चक्रीवादळाची तीव्रता कायम आहे. शनिवारी (ता. १०) ही प्रणाली गोव्यापासून ७०० किलोमीटर वायव्येकडे, मुंबईपासून ६२० किलोमीटर पश्चिमेकडे तर गुजरातच्या पोरबंदरपासून ६०० किलोमीटर नैर्ऋत्येकडे होती. ईशान्य दिशेकडे सरकणारी ही प्रणाली आजपासून काहीशी वायव्येकडे वळण्याचे संकेत आहेत.

वादळामुळे अरबी समुद्र खवळून उंच लाटा उसळण्यास सुरूवात झाली आहे. महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगत समुद्राला भरती आल्याने पाण्याची पातळी वाढली आहे. किनारपट्टीवर जोरदार वारे वाहत आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात, म्यानमार किनाऱ्यावरील कमी दाब क्षेत्र ठळक झाले आहे.

source : agrowon

Monsoon will enter Maharashtra soon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top