Unseasonal Rains : अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश ! मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय
Unseasonal Rains : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे कापूस, भात, तूर, द्राक्ष आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. Eknath Shinde
मागील दोन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाचा नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा यासहित इतर जिल्हांनाही तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले भात पिकेही जमीनदोस्त झाली आहेत. तर कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले असून नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे, त्यांनी तातडीने ७२ तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स अॅप किंवा 1800118485 या टोल फ्री क्रमांकावर अथवा लेखी स्वरुपात तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले.