Rain Forecast : राज्यात वाढणार पावसाचा जोर ! आजचा हवामान अंदाज
Rain Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची वाढलेली तीव्रता, दक्षिणेकडे सरकलेला मॉन्सूनचा आस पूरक ठरल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
आज (ता. १५) पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेर, शिवपूरी, सिधी, जमशेदपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. आग्नेय मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आग्नेय राजस्थान, मध्य प्रदेश, आग्नेय उत्तर प्रदेश, झारखंड ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयाक झाला आहे. Rain Foreacst
विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात ढग जमा होत असून, तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १५) पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट), तर उर्वरित विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. Rain Foreacst
कमी दाब क्षेत्र झाले ठळक
वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली ठळक झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत असलेले हे कमी दाबाचे क्षेत्र शनिवारपर्यंत (ता. १६) ओडिशा आणि छत्तीसगडकडे येण्याचे संकेत आहेत.
जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) :
भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ वर्धा, नागपूर.
विजांसह पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :
नंदूरबार, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा.
source : agrowon