कृषी महाराष्ट्र

पशुपालकांना २० लाख रुपयांची मदत

पशुपालकांना २० लाख रुपयांची मदत

 

परभणी जिल्ह्यातील ३५७ गावांमध्ये बुधवार (ता. ७) अखेर लम्पी स्कीन आजारामुळे बाधित जनावरांची संख्या २ हजार ८०९ होती. त्यापैकी १७४ जनावरे दगावली असून, उपचारानंतर १ हजार ६४२ जनावरे बरी झाली आहेत.

परभणी : परभणी जिल्ह्यातील ३५७ गावांमध्ये बुधवार (ता. ७) अखेर लम्पी स्कीन (Lumpy Skin) आजारामुळे बाधित जनावरांची संख्या २ हजार ८०९ होती. त्यापैकी १७४ जनावरे दगावली (Animal Death) असून, उपचारानंतर १ हजार ६४२ जनावरे बरी झाली आहेत.

या आजारामुळे जनावरे दगावलेल्या ११७ पशुपालकांना २० लाख ४१ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात आली. सध्या या आजाराच्या सक्रिय जनावरांपैकी ९९३ जनावरे गंभीर आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी दिली.

जिल्ह्यात गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव कमी होत नाही. बुधवार (ता. ७)पर्यंत जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांतील ८४९ पैकी ३५७ गावांतील १ हजार १२२ गायी आणि १ हजार ६८७ बैलांना या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराची ईपी सेंटर १४० असून त्याअंतर्गत बाधित गावांची संख्या २१७ आहे. ईपी सेंटरच्या ५ किलोमीटर परिघातील गावांची संख्या ६१२ आहे.

परभणी जिल्ह्यात एकूण जनावरांची संख्या ३ लाख ९८ हजार ३५६ होती. त्यात १ लाख ३७ हजार १५० गायवर्गीय, १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय आणि ९८ हजार ४९५ म्हैस वर्गीय जनावरांचा समावेश आहे. लम्पी स्कीन आजारामुळे १७४ जनावरे दगावली त्यात गायी २७, बैल ६०, वासरे ८७ आहेत. जिल्ह्यातील १ लाख ३७ हजार १५० गाय वर्गीय आणि १ लाख ६२ हजार ७११ बैलवर्गीय असे एकूण २ लाख ९९ हजार ८६१ जनावरांच्या लसीकरणासाठी २ लाख ९९ हजार ३०० लसी प्राप्त झाल्या होत्या.

जिल्ह्यातील गोशाळांतील ३ हजार ९९५ जनावरांचे लसीकरण करण्यात आले. जिल्ह्यात गोवर्गात केलेले स्वच्छ लसीकरण ३३ हजार १९४ आहे. बुधवार (ता. ७)पर्यंत १ लाख ३८ हजार ९१६ गाय वर्गीय आणि १ लाख ५२ हजार ८६९ बैलवर्गीय आणि ५ हजार ६९ वासरे असे एकूण २ लाख ९६ हजार १५६ जनावरांचे (९८.९९ टक्के) लसीकरण पूर्ण झाले आहे.

‘लम्पी स्कीन’ची नवीन लक्षणे…

जनावरांमध्ये लम्पी स्कीन आजाराची काही नवीन लक्षणे आढळून येत आहेत. त्यात तोंडामध्ये, श्‍वसन नलिकेत गाठी आढळून येत आहेत. वेगवेगळ्या अवयवांना प्रादुर्भाव होत आहे. डोळे तसेच शरीरातील नैसर्गिक रक्त येणे तसेच जनावरांच्या तापमान कमी न होणे यांसारखी लक्षणे आढळून येत आहेत, असे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top