कृषी महाराष्ट्र

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम अडचणीत

सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम अडचणीत

रब्बी

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला; मात्र आता गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचे प्रमाण कमी झाले असून दिवसभर ढगाळ वातावरण आहे.

विक्रमगड, जि. पालघर : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदाचा पाऊस (Rainfall) सरासरीपेक्षा जास्त झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान (farmer’s Loss) झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम (Kharif Season) हातचा गेला; मात्र आता गेल्या चार-पाच दिवसापासून थंडीचे (Cold) प्रमाण कमी झाले असून दिवसभर ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. या ढगाळ हवामानामुळे आता रब्बी हंगामही (Rabi Season) अडचणीत सापडला आहे. यामुळे भाजीपाला पिकाला फटक बसला असून शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

विक्रमगड तालुक्यात व परिसरात रब्बी पिकांच्या क्षेत्रात यंदा मोठी वाढ झाली आहे. या हंगामात शेतकरी मूग, हरभरा, वाल, उडिद, तूर या कडधान्यांबरोबरच काकडी, चवळी, वांगी, मिरची, गवार, टोमॅटो, भोपळा, मेथी, मुळा, पालक आदी भाजीपाल पिक घेतात; पण गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याचे त्याचा परिणाम पिकांवर झाला. लागवड केलेले उडदाचे पीक, तुरीचे पीक हातून जायची वेळ आली आहे. यामुळे तीळ, वालाची वाढ खुंटणार आहे.

जमिनीला पुरेसा ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. आता काही दिवस जास्त थंडी तर काही दिवस ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामातील फळ पिकांची वाढ खुंटली आहे. याचा परिणाम तिळ, उडीद आणि वाल्याच्या वाढीवर होतांना दिसत आहे.

विक्रमगड : रब्बी हंगामात शेतीचे काम करणाऱ्या ट्रॅक्टरमालकांनी ट्रॅक्टरचे भाडेतत्त्वावरील नांगरणी, वखरणी, जमीन सपाटीकरण इत्यादी विविध कामांचे दर वाढवले आहेत. यामुळे शेतीच्या खर्चात आता २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ट्रॅक्टरने नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतितास ६०० रुपये मोजावे लागले होते. यंदा या कामासाठी ८०० ते १००० रुपये द्यावे लागत आहेत. शेती साहित्याच्या किंमतीबरोबर महागाईचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यातच खते, बियाणे, कीटकनाशके यांच्या दरात तिप्पट वाढ झाली आहे. परिणामी रब्बी हंगामातील लागवड खर्चातही मोठी वाढ झाली आहे.

झेंडूवरही परिणाम

ढगाळ वातावरणामुळे फळ आणि भाजीपाला लागवडीवर परिणाम झाला असताना त्याचा फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. यात सर्वाधिक नुकसान झेंडू फुलांच्या उत्पादन होणार आहे. झेंडूच्या रोपांची वाढ खुंटण्याची भीती शेतकऱ्यांकडून वर्तवली जात आहे.

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top