कृषी महाराष्ट्र

राज्यात तापमान वाढीस सुरुवात ! जाणून घ्या या आठवड्यातील हवामान अंदाज

राज्यात तापमान वाढीस सुरुवात ! जाणून घ्या या आठवड्यातील हवामान अंदाज

राज्यात तापमान वाढीस

Weather Update : महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतावर रविवार ते गुरुवार या कालावधीत १००८ इतका समान हवेचा दाब राहील. शुक्रवारी (७ एप्रिल) हवेच्या दाबात वाढ होऊन तो १०१० हेप्टापास्कल होईल.

पुन्हा शनिवारपासून हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल होईल, तेव्हा वायव्य भारतावरील हवेचा दाब वाढून तो १०१२ ते १०१४ हेप्टापास्कल होईल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून राहील. अरबी समुद्र व हिंदी महासागरावर हवेचा दाब १००८ हेप्टापास्कल राहील.

या आठवड्यात अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर व प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअस इतके समान राहील. त्यामुळे एल निनोचा परिणाम सध्या राहणार नाही.

दिनांक ४ एप्रिलनंतर उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर पश्‍चिमी चक्रवाताचा परिणाम सुरू होईल. त्याचा परिणाम विदर्भापर्यंत दिसण्याची शक्‍यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भातील कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपर्यंत वाढून उष्णतेच्या झळा जाणवतील.

महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत कमाल व किमान तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण घटेल. हवामान अत्यंत कोरडे राहील. पूर्व विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील.

धुळे, उस्मानाबाद, बीड, जालना, सोलापूर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने अग्नेय व वायव्येकडून राहील. Weather Update

कोकण

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत किमान तापमान २० ते २१ अंश सेल्सिअस, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील.

सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी, रायगड व पालघर जिल्ह्यांत ८३ टक्के, तर ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७३ ते ७७ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २८ ते २९ टक्के राहील. वाऱ्याची दिशा अग्नेयेकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. नंदुरबार जिल्ह्यात किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील.

नाशिक, जळगाव जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस, धुळे जिल्ह्यात ते २० अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. नाशिक जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ६४ टक्के, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ५२ ते ५८ टक्के, जळगाव जिल्ह्यात ३४ टक्के राहील.

दुपारची सापेक्ष आर्द्रता नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत १४ ते १७ टक्के इतकी राहील.

मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस राहील.

बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, परभणी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० टक्के राहील. जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३३ टक्के राहील.

नांदेड, लातूर व परभणी जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २८ टक्के आणि हिंगोली जिल्ह्यांत २२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते १३ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील.

पश्‍चिम विदर्भ

अकोला, वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, अमरावती जिल्ह्यांत ३९ अंश आणि बुलडाणा जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील.

आकाश निरभ्र राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २१ ते २८ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १३ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.

मध्य विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. वर्धा, नागपूर जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, यवतमाळ जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. Weather Update

वर्धा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २२ ते २४ टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ टक्के राहील. वाऱ्याची दिशा अग्नेय व इशान्येकडून राहील.

पूर्व विदर्भ

भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यांत ४२ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस राहील. भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २७ ते ३० टक्के राहील. चंद्रपूर जिल्ह्यात ४४ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ११ ते २१ टक्के इतकी कमी राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील. राज्यात तापमान वाढीस

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, कोल्हापूर, सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील.

सातारा जिल्ह्यात किमान तापमान १८ अंश सेल्सिअस, पुणे, सांगली जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, नगर व कोल्हापूर जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के राहील.

सातारा, सांगली, पुणे, नगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५८ टक्के, सोलापूर जिल्ह्यांत ४२ टक्के राहील. हवामान अत्यंत कोरडे राहील.

कृषी सल्ला

१) कलिंगड, खरबूज, ऊस, केळी पिकांना ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा.
२) फळबागांवर ८ टक्के केओलीन पावडरची फवारणी करावी.
३) मेथी, कोथिंबीर या पिकांची लागवड करावी.
४) जनावरे, कोंबड्यांना पुरेसे पाणी आणि खाद्य द्यावे. राज्यात तापमान वाढीस

(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, दक्षिण आशिया फोरम ऑन ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी)

हवामानाबद्दल काही प्रश्न : 

[sc_fs_multi_faq headline-0=”h2″ question-0=”नाशिक मध्ये पाऊस कधी पडणार आहे?” answer-0=”नाशिक, महाराष्ट्र, भारत बुधवार, फेब्रुवारी 22, 2023. सुर्य: सूर्योदय 07:00, सूर्यास्त 18:37. चंद्र: चंद्रोदय 08:33, चंद्रास्त 20:52, चंद्र चरण: वाढत चंद्र जिओमैग्नेटिक फील्ड: अस्थिर” image-0=”” headline-1=”h2″ question-1=”पुण्यात आज हवामान कसे आहे?” answer-1=”पुण्यातील हवामान. पुण्यात आजचे तापमान २६ अंश से .” image-1=”” headline-2=”h2″ question-2=”हवामान म्हणजे काय उदाहरण?” answer-2=”हवामान : कोणत्याही भौगोलिक क्षेत्रावर किंवा पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी अनेक वातावरणीय आविष्कार एकाच वेळी घडून आल्यामुळे वातावरणाला जी स्थिती प्राप्त होते, त्या स्थितीला त्या वेळेचे हवामान असे म्हणतात. वातावरणाची ती तत्कालीन स्थिती असते.” image-2=”” headline-3=”h2″ question-3=”पुण्यातील सर्वात कमी तापमान किती होते?” answer-3= “17 जानेवारी 1935 रोजी सर्वात कमी तापमान 1.7 °C (35 °F) नोंदवले गेले.” image-3=”” count=”4″ html=”true” css_class=”” राज्यात तापमान वाढीस ]

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top