कृषी महाराष्ट्र

PM KISAN : योजनेत झाला मोठा बदल ! 14 वा हफ्ता कधी मिळणार ? वाचा सविस्तर

PM KISAN : योजनेत झाला मोठा बदल ! 14 वा हफ्ता कधी मिळणार ? वाचा सविस्तर

PM KISAN

नवी दिल्ली : यंदा आस्मानी संकटाने शेतकरी हवालदिल झाला आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळीने धुमाकूळ घातला. तर उत्तर भारतात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील काही भागात पावसाचा टिपूस ही पडला नाही तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. काही भागात अजूनही पेरणीची लगबग सुरु झाली नाही.

जुलै महिना आला तरी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान शेतकऱ्यांसाठी (Farmer) केंद्र सरकारने अनेक योजना सुरु केल्या आहेत. आता या योजनेतील (Central Scheme) शेतकऱ्यांना लवकर धनलाभ होणार आहे. या योजनेतील 14 वा हफ्ता या दिवशी त्यांच्या खात्यात थेट जमा होईल. कोट्यवधी शेतकऱ्यांना त्यामुळे लाभ होईल.

योजनेत बदल

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत(PM Kisan Samman Nidhi Yojana) अनेक शेतकरी लाभार्थी आहेत. त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे. या योजनेत आता मोठे बदल झाले आहेत. त्याचा थेट परिणाम देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांवर होईल.

भारत सरकार लवकरच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत करणार आहे. पण त्यापूर्वी केंद्र सरकारने मोठा बदल केला आहे.

बोगसगिरीला बसणार चाप

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील बोगसगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. लाभार्थ्यांना त्यांचे स्टेट्स पाहण्याची पद्धत पण पूर्णपणे बदलली आहे. याशिवाय केंद्र सरकार पीएम किसान मोबाईल ॲप घेऊन आली आहे.

या मोबाईल ॲपमुळे अनेक बदल झाले आहेत. तक्रार करण्यापासून वेळोवेळी येणारे अपडेट्स लाभार्थ्यांना समजणार आहेत. लाभार्थ्यांना स्टेट्स बघण्यासाठी नोंदणी करणे आणि नोंदणी क्रमांकाचा वापर करणे आवश्यक आहे.

ई-केवायसी

या योजनेतील बोगसगिरीला आळा घालण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने पीएम किसान मोबाईल ॲप आणले आहे. हे मोबाईल ॲप सुरु झाल्याने बोगस लाभार्थ्यांना चाप बसेल.

त्यासाठी या ॲपमध्ये फेस ऑथेन्टिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. या नवीन तंत्रज्ञाना आधारे शेतकऱ्यांना त्यांचे ई-केवायसी अगदी सहज करता येईल. त्यांना वन टाईम पासवर्ड आणि फिंगरप्रिंटची गरज राहणार नाही.

या दिवशी जमा होईल 14वा हप्ता

केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील 13 हप्ते जमा केले आहेत. देशभरातील शेतकरी पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत. 14वा हप्ता कधी जमा होईल, याची त्यांना प्रतिक्षा लागली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार 15 जुलै पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हप्ता जमा करणार आहे. या योजनेतील निधी शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात येईल. केंद्र सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

source:tv9marathi

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top