कृषी महाराष्ट्र

आजचा हवामान अंदाज ०५ मे २०२३ : राज्यावर वादळी पावसाचे संकट कायम

आजचा हवामान अंदाज ०५ मे २०२३ : राज्यावर वादळी पावसाचे संकट कायम

आजचा हवामान अंदाज

Weather Update Pune वादळी पावसाचे सावट कायम असल्याने ढगाळ हवामान (Cloudy Weather) होत आहे. राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. आज (ता. ५) राज्याच्या तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कमाल तापमानातील वाढ-घट कायम राहण्याचा अंदाज आहे.

पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात ढगाळ वातावरण आणि उकाड्यात वाढ कायम आहे. गुरूवारी (ता. ४) परभणी जिल्ह्यातील जिंतूर व परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील मंठा शहर आणि तालुक्यात सकाळी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

यातच शुक्रवारी (ता. ५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३१ ते ३६ अंशांच्या दरम्यान स्थिरावले आहे. Weather Update

नैर्ऋत्य मध्य प्रदेशापासून मराठवाडा, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत असलेली हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

आज (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहून, मेघगर्जना आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. Weather Update

गुरूवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३३.९ (१९.४), जळगाव ३५.० (-), कोल्हापूर ३४.१ (२१.६), महाबळेश्वर २८.१ (१५.४), नाशिक ३३.९(२१.५),

निफाड ३६.५ (२२.२), सांगली ३४.८ (२१.६), सातारा ३५.२ (२०.०), सोलापूर ३६.६ (२४.०), सांताक्रूझ ३२.७ (२५.४), डहाणू ३२.७ (२४.४), रत्नागिरी ३३.८ (२४.८),

छत्रपती संभाजीनगर ३४.२ (१९.८), नांदेड ३१.२ (२१.६), धाराशिव ३५.४ (२१.२), परभणी ३३.३ (२२.०), अकोला ३३.० (२२.०), अमरावती ३१.८(२०.८), बुलढाणा २९.६ (२२.०), ब्रह्मपूरी २८.२ (२०.८),

गडचिरोली २८.२(२१.२), गोंदिया २९.८ (२१.२), नागपूर २८.६ (२०.९), वर्धा २९.०(२१.४), वाशीम ३०.२ (२१.६), यवतमाळ २९.५ (२०.७).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

कोकण : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

मध्य महाराष्ट्र, : धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर.

विदर्भ : बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात उद्यापर्यंत (ता. ६) चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे या भागात रविवारपर्यंत (ता. ७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहेत.

या प्रणालीची तीव्रता वाढून उपसागरात चक्रीवादळ घोंघावण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. ही वादळी प्रणाली उत्तरेकडे सरकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आजचा हवामान अंदाज आजचा हवामान अंदाज आजचा हवामान अंदाज

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top