कृषी महाराष्ट्र

आजचा हवामान अंदाज : विदर्भात वादळी पावसाचा इशारा ! वाचा संपूर्ण

आजचा हवामान अंदाज : विदर्भात वादळी पावसाचा इशारा ! वाचा संपूर्ण

हवामान अंदाज

Weather Update Pune : पावसाच्या दडीने विदर्भात आलेली उष्ण लाट कायम आहे, तर राज्यातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आजपासून (ता. २३) कोकणात पाऊस वाढण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुरूवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपूरी येथे ४२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार असल्याने तसेच सरासरीच्या तुलनेत ४.५ ते ६.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्याने विदर्भात उष्ण ते तीव्र उष्ण लाट आली आहे. उर्वरित राज्यात तापमान ३३ ते ४२ अंशाच्या दरम्यान आहे.

उत्तर प्रदेशमध्ये कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, त्यापासून दक्षिण पंजाबपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेशात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

राज्यात जोरदार वारे वाहत असून, ढगाळ हवामान होत आहे. गुरूवारी (ता. २२) विदर्भात ढगांची दाटी झाली होती. आज (ता. २३) कोकणातील सिंधुदूर्ग जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट), तर विदर्भात वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. Monsoon

पूर्वोत्तर राज्यात धुव्वाधार पाऊस

पूर्वोत्तर राज्यांमध्ये मॉन्सून सक्रिय असल्याने धुव्वाधार पाऊस सुरू आहे. गुरूवारी (ता. २२) मेघालय राज्यातील खासी टेकड्यांच्या परिसरातील मौकिर्वाट येथे ३७० मिलीमीटर, तर मौसीनराम येथे २९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

आसाम, मेघालयातही मॉन्सून दमदार कोसळत असून विविध ठिकाणी १८० ते २५० मिलीमीटर पाऊस पडला आहे. सिक्कीम, अरूणाचल प्रदेशासह पश्चिम बंगाल, तसेच कमी दाब क्षेत्रामुळे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशात अतिवृष्टीची नोंद झाली. दक्षिणेकडील राज्यातही मॉन्सून सक्रिय आहे Monsoon

गुरूवारी (ता. २२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३४.९ (२४.२), जळगाव ३७.७ (२७.०), धुळे ३८.० (२५.०), कोल्हापूर ३३.७ (२३.९), महाबळेश्वर २४.५ (१८.०), नाशिक ३४.० (२३.६),

निफाड ३३.५ (२४.६), सांगली ३५.९ (२४.१), सातारा ३४.१ (२३.६), सोलापूर ३८.१ (२५.४), सांताक्रूझ ३४.३ (२८.६), डहाणू ३४.५ (२८.५), रत्नागिरी ३३.२ (२८.२),

छत्रपती संभाजीनगर ३५.२ (२३.५), नांदेड ३९.४ (२९.४), परभणी ३८.३ (२७.९), अकोला ३९.८ (२८.९), अमरावती ४१.०(२६.३), बुलढाणा ३६.६ (२५.६), ब्रह्मपूरी ४२.२ (२८.५),

चंद्रपूर ४२.६(२७.०), गडचिरोली ४१.२ (२८.६), गोंदिया ४१.२ (२८.६), नागपूर ४०.५ (२८.७), वर्धा ४१.०(३०.८), वाशीम ३९.२(२६.८) यवतमाळ ३९.७ (२७.५).

जोरदार पावसाचा इशारा :

सिंधुदूर्ग.

वादळी पावसाचा इशारा :

धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top