कृषी महाराष्ट्र

व्यापाऱ्यांचा अंदाज – दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार

व्यापाऱ्यांचा अंदाज – दिवाळीनंतर कांदा ५० रुपयांवर जाणार

 

गेल्या अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. असे असताना आता दिवाळीनंतर कांद्याचे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सध्या कांद्याचा किरकोळ भाव 40 रुपये किलोच्या पुढे गेला असून, तो 50 रुपये किलोपर्यंत जाईल, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, ऑक्टोबरच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात कांदा १५ ते २५ रुपये किलोने मिळत होता. लवकरच कांद्याचा जुना साठा संपणार असून, सध्याचा पुरवठा शेतकऱ्यांकडून नसून त्या साठ्यातून होत आहे. त्यामुळेच कांद्याचे भाव वाढत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचे म्हटले जात आहे. किरकोळ बाजारात कांदा महागला आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशभरात कांद्याचे भाव वाढले आहेत. यामुळे वखारीत ठेवलेला कांदा शेतकरी बाहेर काढू लागले आहेत. पावसामुळे कांदा खराब होत आहे. गेल्या आठवड्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत सुमारे 60-80% वाढ झाली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ताजे पीक बाजारात येईपर्यंत किमतीतील तेजी कायम राहील.

मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. परंतु महाराष्ट्राताला कांदा इतर राज्यांच्या तुलनेत चांगला असल्याने या कांद्याला देशभरातून मागणी आहे. दसरा दिवाळी दरम्यान कांद्याची मागणी वाढते. महाराष्ट्रात आयात कांद्याची मागणी वाढणार असा अंदाय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कांद्याची किंमती वाढतील असे सांगितले जात आहे.

दरम्यान, पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा कांदा खराब झाला. यामुळे राहिलेल्या कांद्याला तरी चांगला दर मिळावा अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. यामुळे आता दिवाळीनंतर तरी कांद्याला चांगला दर मिळणार का याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सध्या परतीच्या पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कांदा ५० रुपयांवर

गेल्या 15 दिवसांत कांदा खरेदी महागली आहे

स्टॉकमध्ये कांदा खरेदी करताना 15 दिवसांपूर्वी कांदा खरेदी 30 ते 40% जास्त आहे. कांद्याचा खरेदी दर 15 ते 30 रुपये प्रतिकिलो आहे. रब्बी पीक आल्यानंतर भाव स्थिर होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. एकूण कांदा उत्पादनात रब्बी कांद्याचा वाटा ७०% आहे. खरीप कांद्याचा वाटा फारच कमी असतो परंतु सप्टेंबर-नोव्हेंबर या अल्प कालावधीत पुरवठा राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

 

श्रोत :- krishijagran.com

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top