कृषी महाराष्ट्र

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे व पिकातील कार्यपद्धती

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे व पिकातील कार्यपद्धती

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेचे फायदे

ट्रायकोडर्माच्या अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन महत्त्वाच्या प्रजाती मातीत मुबलक प्रमाणात आढळतात.

ट्रायकोडर्माच्या (Trichoderma) अनेक प्रजाती असल्या तरी त्यातील ट्रायकोडर्मा ॲस्पेरिलियम (व्हिरिडी) आणि ट्रायकोडर्मा हर्जियानम या दोन महत्त्वाच्या प्रजाती मातीत मुबलक प्रमाणात आढळतात. त्या शेती व पिकाच्या दृष्टिकोनातून सुरक्षित आणि महत्त्वाच्या आहेत. शेतीमध्ये त्याचा वापर केल्याने निसर्गात कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ट्रायकोडर्माची पिकांतील कार्यपद्धती, कोणकोणत्या रोगावर ट्रायकोडर्मा उपयुक्त ठरते याबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.

ट्रायकोडर्माची पिकांतील कार्यपद्धती?

पिकातील अँटिऑक्सिडेंट क्रियांचे प्रमाण वाढवते.

ट्रायकोडर्मा ही जमिनीतील वेगवेगळ्या बुरशींना विळखा घालून त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी, रोगकारक बुरशीमध्ये कार्बन, नायट्रोजन, जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण होते.

ट्रायकोडर्मा हे ग्लायटॉक्झिन व व्हिरिडीन नावाचे प्रतिजैविक मातीमध्ये निर्माण करतात. त्यामुळे रोगकारक बुरशीचे प्रमाण कमी होते.

ट्रायकोडर्मा वापरण्याचे फायदे काय आहेत?

बियाण्याची उगवणशक्ती वाढते.

वनस्पतीच्या जैवरासायनिक प्रक्रियेत बदल करून वनस्पतीची प्रतिकारकशक्ती वाढवते.

रोपांच्या मुळांच्या संख्येत आणि लांबीमध्ये वाढ होते. पिकाची वाढ जोमात होते.

रोपांच्या मुळांवर ट्रायकोडर्माची वाढ झाल्याने रोगकारक बुरशीचा प्रवेश मुळांपर्यंत होऊ शकत नाही. त्यामुळे रोप कुजणे, मूळकूज, कंठीकूज, कोळशी, दाणेबुरशी, बोट्रायटिस, मर इ. रोगांपासून संरक्षण मिळते.

ट्रायकोडर्मा ही बुरशी मातीमध्ये सेंद्रिय पदार्थावरही वाढते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ व्यवस्थित असलेल्या जमिनीमध्ये तिचा प्रभाव दीर्घकाळ टिकून राहते.

ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यावी?

कोरड्या जमिनीत ट्रायकोडर्माचा वापर करू नये.

ट्रायकोडर्मा वाढीसाठी जमिनीमध्ये योग्य आर्द्रता आवश्यक आहे.

ट्रायकोडर्माद्वारे प्रक्रिया केलेले बियाणे थेट सूर्यप्रकाशात ठेवू नये.

पुढील पीक आणि बुरशीजन्य रोगांवर ट्रायकोडर्मा उपयुक्त ठरते

ज्वारी — काणी, कोळशी, दाणेबुरशी

हळद — कंदकूज

आले (अद्रक) — कंदकूज

तूर — फायटोप्थोरा, मर

हरभरा — मर, मूळकूज

सोयाबीन — मर, मूळकूज

मिरची — मर, मूळकूज

भुईमूग — कंठीकूज, मूळकूज

टरबूज — मर

मोसंबी — मर

केळी — मर

श्रोत :- agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top