Panjab Dakh Havaman Andaj : पंजाब डख यांचा शेतकरी व नागरिकांना इशारा
Panjab Dakh Havaman Andaj : पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज, राज्यातील शेतकरी व नागरिकांना दिला हा इशारा, 25 तारखेपर्यंत राज्यात…
माहिती व्हिडिओ स्वरूपात बघण्यासाठी खालील व्हिडिओ चालू करा.
राज्यातील व देशातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज आज आला असून पंजाबराव डख यांनी थंडीची लाट या विषयावर आपला अंदाज शेतकरी बांधव व राज्यातील नागरिकांसाठी दिला आहे आज आपण जाणून घेऊयात पंजाबराव डख हे काय सांगतात. या अंदाजाने शेतकरी शेतातील आपल्या पिकांची काळजी घेऊन होणाऱ्या नुकसानी पासून वाचू शकतो त्यामुळे हा अंदाज शेवटपर्यंत नक्की बघा.
पंजाबराव डख म्हणतात की 25 जानेवारी पर्यंत राज्यात थंडीची लाट राहिलं! (तसेच वातावरणात बदल झाल्यावर नवीन हवामान अंदाज देण्यात येईल)
पंजाबराव डख यांचा विभागवार अंदाज:
उत्तर भारतामध्ये थंडी असल्या कारणाने महाराष्ट्रात थंडी व दड किंवा दैवर किंवा बोध पडेल असे डख सांगतात. विदर्भात 25 जानेवारीपर्यंत थंडी असेल व वातावरणात थोड्या प्रमाणात धुके राहील.
मराठवाड्या मध्ये 25 जानेवारीपर्यंत कडक्याची थंडी असेल. पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात थोडे धुके असेल पण कडाक्याची थंडी असेल.
उत्तर महाराष्ट्रात 12 आणि 13 जानेवारीला अंशतः ढगाळ वातावरण राहील पण रात्री थंडी जाणवेल. 25 जानेवारीपर्यंत थंडीचे प्रमाण अधिक राहील.
शेतकरी व नागरिकांना माहितीस्तव:
जम्मू आणि काश्मीर राज्य, पंजाब, दिल्ली, हरियाणा आणि उतर प्रदेश या राज्यामध्ये थंडीचा पारा खाली घसरल्यामुळे महाराष्ट्रात व संपूर्ण देशात थंडीची लाट आली आहे. पंजाब डख सांगतात की हे शेवटी अंदाज आहेत, वाऱ्या मध्ये बदल झाला की वेळ, ठिकाण व दिशा, बदलते हे माहीत असावे.
स्रोत : krushiyojana.com