कृषी महाराष्ट्र

टरबूज / खरबूज लागवड माहिती व तंत्रज्ञान

टरबूज / खरबूज लागवड माहिती व तंत्रज्ञान

टरबूज / खरबूज

लागवड – डिसेंबर जानेवारी

जमीन – मध्यम हलकी पाण्याची योग्य निचरा होणारी
लागवडीची दिशा दक्षिण-उत्तर ठेवावी
लागवडीचे अंतर जमिनीच्या मगदुरानुसार
हलकी जमीन
सहा बाय दोन फूट
मध्यम जमीन
सात बाय दोन फूट
काळी जमीन
दहा बाय दीड फूट दहा बाय दोन फूट

एकरी बियाणे
300 ते 500 ग्राम बियाण्यांच्या वजनानुसार ( कुंदन, बॉबी, मधुमिता खरबुजाच्या जाती )

बियाणे प्रक्रिया
थंडी असताना बियाणे 12 तास कोमट पाण्यात भिजवावे रोगप्रतिकार उपाय म्हणून एक लिटर पाण्यामध्ये पाच ग्राम कार्बन डाय घालावे बियाणे एक तास सावलीत वळून लागवडीसाठी घ्यावे.
मल्चिंग पेपर टाकण्यापूर्वी बेडवर टाकायचा प्रतिएकरी बेसल डोस
1)डीएपी 50 किलो
2)एम ओ पी 50 किलो
3) हुमिक ॲसिड दाणेदार 25 किलो
4)अमोनियम सल्फेट 50 किलो
4) निंबोली पेंड 200 किलो
5)फरटेरा 4 किलो

ड्रीप द्वारे द्यायचे अन्नद्रव्य
लागवडीनंतर 8ते 10दिवसांमध्ये ट्रायकोडर्मा 1 लिटर व सुडोमोनास 1 लिटर 2kg गुळाचे पानांमध्ये सोडण्यापूर्वी आदल्या दिवशी दहा लिटर पाण्यामध्ये मिश्रण करावे, दुसऱ्या दिवशी पिकाला द्यावे.

लागवडीनंतर 15 दिवसांनी
1) 12 /61 /00 10 किलो
2)युरिया 25 किलो
3)मॅग्नेशियम सल्फेट 3किलो
3) हुमिक एसिड पावडर 500ग्राम 4)मायक्रोन्यूटन दोन किलो पाण्यात विद्राव्य असणाऱ्य वरील डोस 15 ते 25 दिवसांमध्ये कम्प्लीट करावा.

25 दिवसांपासून

19 19 19 10 किलो
2) मॅग्नेशियम सल्फेट 3किलो
3) इसाबियन 500मिली
वरील दोन 25 ते 35 दिवसांमध्ये पूर्ण करावा .

35 दिवसापासून

1) 13/00 / 45 10 किलो
2) कॅल्शियम नायट्रेट 10किलो
3)चिलेटेड मॅग्नेशियम 500 ग्राम
4)बोरान 500ग्राम

वरील डोस 35 ते 45 दिवसांमध्ये पूर्ण करावा.

45 व्या दिवसापासून 1)मॅग्नेशियम सल्फेट 3किलो
2)00/ 52/34 10 किलो वरील डोस 45 ते 55 दिवसांमध्ये पूर्ण करावा.
55 दिवसांपासून 1)00/ 52/ 34 10 किलो
2)मॅग्नेशिअम सल्फेट 3 किलो चिलेटेड
3) कॅल्शियम 500ग्राम
4) बोरान 500ग्राम वरील रोज 55 ते 65 दिवसांमध्ये पूर्ण करावा

65 दिवसापासून

1)00/00/50 10kg
2)पोटॅशियम सोनाईट 15 किलो
वरील डोस 65 ते 75 दिवसापर्यंत पुर्ण करावा.

रोग व कीड

अ) रोग

भुरी – या रोगाची सुरवात पानापासून होते. पानाच्या खालच्या बाजूस पिठासारखी बुरशी वाढते. नंतर ती पंच्या पृष्टभागाव्रर वाढते त्यामुळे पाने पांढरी दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.

उपाय – डीनोकॅप किंवा कार्बेन्दँझिम हे औषध ९० लिटर पाण्यात १० ग्रॅम या प्रमाणत मिसळून फवारावे.नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फवारवे. नंतर दर १५ दिवसांनी २ ते ३ वेळा फावरणी करावी.

केवडा – पानाच्या खालच्या बाजूला पिवळ्या भुरकट रंगाचे ठिपके दिसतात नंतर पानाचे देठ व फांद्यावर याचा प्रसार होतो.

उपाय – डायथेन झेड -७८ ०.२% तीव्रतेची फवारणी करून हा रोग आटोक्यात आणता येईल.

मर – हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो. पाने पिवळी पडतात. फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात. व कालांतराने मारतात.

उपाय – हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. त्यामुळे पेरणीपुर्व १ किलो बियाण्यास ३ ग्रॅम थायरम चोळावे.

इतर माहिती :- टोमॅटो लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन

ब) कीड

फळमाशी –: या माशीच्या अळीमुळे पिकाचे नुकसान होते. माशी फळांच्या सालीत अंडे घालते . त्यामुळे आळी फळातील गर खाते त्यामुळे फळे सडतात.

उपाय -:: कीड लागलेली व खाली पडलेली फळे नष्ट करावीत. पिकावर व जमिनीवर मेँलाँथीऑन या औषधाचा १ टक्का तीव्रतेचा फवारा मारावा.

तांबडे भुंगे ::– बी उगूवून अंकुर वर आल्यावर त्याच्यावर नारंगी तांबड्यारंगाचे भुंगेरे उपजीविका करतात.

मावा ::– हिरव्या किंवा काळ्या रंगाचे बारीक किडे पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पिवळी पडून मलूल पडतात.

उपाय – किड दिसल्यास रोगर किंवा मॅलॅथिऑन हे औषध ०.१ टक्का या प्रमाणात फवारावे.

काढणी व उत्पादन

कलिंगड व खरबूज काढणी फळ पुर्ण पिकल्यावर करतात. नदीच्या पत्रातील फळे बगयातीपेक्षाथोडी लवकर तयार होतात. बी पेरल्यापासून ३ ते ३.५ महिन्यात काढणी सुरु होते व ३ ते ४ आवडयात पुर्ण होते. आकार व रंगावरून फळांची पक्वता ठरविणे कठीण आहे. फळ तयार झाल्याची काही लक्षणे खालील प्रमाने आहेत.

कलिंगडात देठाजवळ बाळी (टेन्दरील) सुकली कि ते तयार झाले असे समजावे.
तयार फळ हाताने ठोकून पाहिल्यास ‘बद’ असा आवाज येतो. मात्र कच्चेअसल्यास ध्तुच्या वस्तू ठोकल्यावर निघतो तसा आवाज येतो.कलिंगडाच्या जमिनीला स्पर्श करणाऱ्या भागाचा पंधुरका रंग बदलून तो पिवळसर झाल्यास फळ तयार झाले असे समजावे .

तयार फळावर हाताने दाब दिल्यास करर असा फळातून आवाज येतो. फळ तयार असल्यास देठाजवळ लव अजिबात दिसत नाही. देठ अगदी गुळगुळीत दिसतो.

टरबूज /खरबूज पिकांमधील काही महत्त्वाच्या टिप्स

1)टरबूज /खरबूज ची रोप करूनच शक्यतो पिकाची लागवड करावी, कारण पिकामध्ये चुका( खाडण्या) होणार नाही.
2)बी लावलेली असेल तर रोपाच्या लहान अवस्थेमध्ये रोपे कुरतडतात त्यासाठी रोपाच्या भोवती मुरमुरे गाऊचू किंवा क्यालडॉन लावून रोपाच्या भोवती 6 ते 8मुरमुरे टाकावी.
3) रोपे लावण्यापूर्वी मल्चिंग पेपरला होल केलेल्या ठिकाणी माती भरावी.
4) पिकाचा चारी बाजूला कराळ किंवा मोहरी ची लागवड करावी जेणेकरून मधमाशी आत्कर्षला जातील,परागीकरण करण्याला मदत होईल.
5) 25/30 एकरी पिवळे / निळे चिकट सापळे लावावे.
6) फळ माशी साठी मशिकारी ट्रॅप लावावी.
7) लागवड हिवाळ्यामध्ये असेल तर पिकाला पाणी शक्यतो रात्री किंवा सकाळी 7 वाजण्यापूर्वी द्यावे.
8) भेंडी व भुईमूग पिकास शेजारी टरबूज / खरबूज याची लागवड करू नये.

जैविक शेतकरी
शरद केशवराव बोंडे
९४०४०७५६२८

श्रोत :- krushi.world

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top