कृषी महाराष्ट्र

आजचा हवामान अंदाज 11 एप्रिल 2023 : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा !

आजचा हवामान अंदाज 11 एप्रिल 2023 : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा !

आजचा हवामान अंदाज

Weather Update Pune राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचे संकेत आहेत. राज्याच्या तापमानातही (Temperature) चढ-उतार सुरूच असून, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. आज (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा (Rain Forecast) इशारा हवामान विभागाने (Weather Department) दिला आहे.

राज्यावर वादळी पावसाचे सावट असले तरी कमाल तापमानात वाढ होत आहे. तापमान ३७ अंशांपार गेलेल्या ठिकाणी उन्हाचा चटका तापदायक ठरत असून, उकाड्यातही मोठी वाढ झाली आहे. Rain Prediction

सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर आणि ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे तापमान ३९ अंशावर पोचले होते. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान वाढून ३४ ते ३७ अंशांच्या दरम्यान होते. Rain Prediction

आग्नेय अरबी समुद्रामध्ये समुद्र सपाटीपासून १.५ ते ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. ११) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. राज्यात कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

सोमवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ३६.९ (१९.३), जळगाव ३९.० (२१.७), धुळे ३८ (१९.२), कोल्हापूर ३५.८ (२३.१), महाबळेश्वर २९.८ (१८.५), नाशिक ३६.७ (२१.३),

निफाड ३७.२(१६.७), सांगली ३६.६ (२१.७), सातारा ३४.८ (२०.५), सोलापूर ३८.९ (२२.०), सांताक्रूझ ३६.४ (२५.८), डहाणू ३४.५ (२४.१), रत्नागिरी ३६.४ (२३.६),

छत्रपती संभाजीनगर ३४.८ (१९.८), नांदेड ३६.४ (२३.८), परभणी ३६.६ (२१.५), अकोला ३७.९ (२०.४), अमरावती ३६.४(२०.९), बुलडाणा ३३.५ (२१.०), ब्रह्मपुरी ३९.२ (२१.३),

चंद्रपूर ३९.२ (२५.४), गडचिरोली ३४.४(२०.६), गोंदिया २६.२ (२२.६), नागपूर ३६.४ (२२.९), वर्धा ३७.२(२१.९), वाशीम ३६.८ (१८.४), यवतमाळ ३६.५ (१९.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव. आजचा हवामान अंदाज आजचा हवामान अंदाज

source:agrowon

Today’s weather forecast 11 April 2023, Thunderstorm warning in Madhya Maharashtra, Marathwada

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top