हवामान अंदाज – राज्यात पावसाचा जोर कमी
मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे.
पुणे : मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र निवळल्यानंतर राज्यात पावसाचा जोर (Rain Intensity) कमी झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात वाढ (Heat) झाली आहे. आज (ता. २५) राज्यात मुख्यतः पावसाची उघडीप राहून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता (Rainfall Forecast) हवामान विभागाने (weather Department) वर्तविली आहे.
आग्नेय राजस्थान आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणाली पासून उत्तर छत्तीसगडपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली
राज्यात ढगाळ वातावरण असून, कमाल तापमान आणि उकाड्यात वाढ झाली आहे. आज (ता. २५) राज्यात आकाश ढगाळ राहून, मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. उद्यापासून (ता. २६) पुन्हा पावसाला पोषक हवामान होण्याचे संकेत आहेत.
मॉन्सूनची परतीची वाटचाल थांबली
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) वायव्य भारतातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. मंगळवारी (ता. २०) राजस्थानच्या खाजूवाला, बिकानेर, जोधपूर, आणि गुजरातच्या नालिया पर्यंतच्या भागातून मॉन्सून परतला आहे. त्यानंतर मात्र मॉन्सूनची परतीची वाटचाल काहीशी थबकली आहे. परतीच्या प्रवासात कोणतीही वाटचाल न झाल्याने शनिवारी (ता. २४) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती.
संदर्भ :- agrowon.com