कृषी महाराष्ट्र

PM Kisan 14th Installment : जूनच्या कोणत्या आठवड्यात मिळणार 14 व्या हप्त्याची रक्कम ?

PM Kisan 14th Installment : जूनच्या कोणत्या आठवड्यात मिळणार 14 व्या हप्त्याची रक्कम ?

14th Installment

PM Kisan Yojana: केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित एक मोठे अपडेट आणले आहे. 14वा हप्ता निघणार आहे, ज्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेंतर्गत 13 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.

आता पुढचा म्हणजेच 14 वा हप्ता लवकरच रिलीज होण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुढील हप्ता जूनमध्ये येईल, असे सांगितले जात आहे. तुम्हीही पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर, योजनेचा १४ वा हप्ता कधी मिळेल ते येथे जाणून घ्या.

वर्षाला ६ हजारांची मदत मिळते

मोदी सरकारकडून देशातील शेतकरी बांधवांना आर्थिक मदत म्हणून वर्षभरात 6 हजार रुपयांचे तीन हप्ते जाहीर केले जातात. याअंतर्गत चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवले जातात.

आता या योजनेंतर्गत 14वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवला जाणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हप्त्याची रक्कम जूनच्या तिसऱ्या आठवड्यात शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते. मात्र, मोदी सरकारकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही अपडेट किंवा अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

PM किसान योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या दृष्टिकोनातून, मोदी सरकारकडे पुढील हप्ता जारी करण्यासाठी जुलै 2023 पर्यंत वेळ आहे. अशा परिस्थितीत, जून ते जुलै दरम्यान केव्हाही 14 व्या हप्त्यासाठी पैसे पाठवण्याची अटकळ जोरात सुरू आहे.

पुढील हप्त्याचा लाभ कोणाला घेता येणार नाही ?

जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, परंतु आतापर्यंत तुम्ही या योजनेअंतर्गत ई-केवायसी आणि जमीन पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करू शकला नाही, तर ते करा, अन्यथा तुमच्या 14व्या हप्त्याची रक्कम अडकू शकते. जमीन पडताळणीसाठी तुम्हाला कृषी विभागाच्या कार्यालयात जावे लागेल.

source : krishijagran

पीएम किसान निधि, पीएम किसान योजना, PM Kisan 14th Installment, pm kisan ekyc

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top