कृषी महाराष्ट्र

Cotton Market Price : कापसाला क्विंटलमाघे परभणीत सरासरी ७ हजार रुपये दर

Cotton Market Price : कापसाला क्विंटलमाघे परभणीत सरासरी ७ हजार रुपये दर

Cotton Market Price

Parbhani News : जिल्ह्यातील मानवत, सेलू या कापसाच्या प्रमुख बाजार पेठांमधील कापूस खरेदीच्या दरात मागील आठवड्याच्या तुलनेत क्विंटल मागे ३०० ते ४०० रुपयांची घसरण झाली आहे. शनिवारी (ता.१०) सेलू बाजार समितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान ७१५० ते किमान ६३०५ रुपये तर सरासरी ७ हजार रुपये दर मिळाले.

केंद्र सरकारने येत्या खरीप हंगामातील कापसासाठी हमीभाव वाढ जाहीर केल्यानंतर कापूस दरात सुधारणा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु दरात नरमाईच आहे. परभणी जिल्ह्यातील बाजार समित्यांतील कापसाच्या दरात २३ ते २६ मे या चार दिवसांत किमान दर साडेपाच हजारांपेक्षा कमी तर कमाल दर सात हजार रुपयांपेक्षा कमी होते.

२७ मे पासून दरात ५०० ते ७०० रुपयांची सुधारणा होऊन कमाल दर सात हजारांवर तर किमान दर साडेपाच ते सहा हजार रुपये राहिले. सोमवार (ता.५) पासून कापसाच्या दरात परत एकदा घसरण सुरु झाली. गुरुवारी (ता.८) सेलू बाजार समितीत क्विंटलला किमान ५५०० ते कमाल ७१८० रुपये दर मिळाले. शुक्रवारी(ता.९) किमान ६००० ते कमाल ७२२५ रुपये तर सरासरी ७१७० रुपये दर मिळाले.

मानवत बाजार समितीत गुरुवारी किमान ५६०० ते कमाल ७११५ रुपये तर सरासरी ७००० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता.७) कापसाची ६३५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५५०० ते कमाल ७२५५ रुपये तर सरासरी ७१०० रुपये दर मिळाले. Cotton Market

गेल्या आठवड्यात दरात सुधारणा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस घराबाहेर काढला. त्यामुळे आवक वाढली. त्यामुळे दरात पुन्हा घट झाली आहे. खरीप पेरणीमुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी आणत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक नड लक्षात घेऊन व्यापारी दर पाडून खरेदी करत आहेत. खेडा खेरदीचे दर आणि बाजार समित्यांतील दर यामध्ये ३०० ते ४०० रुपयांचा फरक आहे. Cotton Market

source : agrowon

कापूस भाव आजचा महाराष्ट्र, कापूस मार्केट, kapus bhav today, kapus bhav today maharashtra

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top