कृषी महाराष्ट्र

Cotton Bajarbhav : वायद्यांमध्ये कापसाला हंगामातील निचांकी भाव !

Cotton Bajarbhav : वायद्यांमध्ये कापसाला हंगामातील निचांकी भाव !

Cotton Bajarbhav

Cotton Bajarbhav : जून महिना संपत आला तरी कापसाचे भाव दबावातच आहेत. वायद्यांमध्ये तर कापसाने हंगामातील निचांकी भाव गाठला. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस दरात नरमाई दिसत आहे. बाजार समित्यांमध्ये कापसाला आजही प्रतिक्विंटल सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये भाव मिळाला.

देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील नरमाई कायम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सायंकाळपर्यंत कापूस वायद्यांनी ८० सेंटपेक्षा कमी दराची पातळी गाठली होती.

इंटरकाॅन्टीनेन्टल एक्सचेंज प्लॅटफाॅर्मवर कापसाचे वायदे ७९.३० सेंट प्रतिपाऊंंडलवर होते. तर जगभरातील प्रत्यक्ष कापूस खरेदीच्या भावाची सरासरी ९२ सेंट प्रतिपाऊंड होती. जागतिक बाजारात कापूस आणि सुताला मागणी घटल्याचा परिणाम दरावर होत असल्याचे जाणकारांनी सांगितले.

देशातही आज कापूस वायदे नरमले आहेत. सायंकाळपर्यंत कापूस वायद्यांमध्ये ५०० रुपयांची नरमाई आली. एमसीएक्सवर कापूस वायदे ५५ हजार ४६० रुपयांवर पोचले. एमसीएक्सवर कापूस वायद्यांमध्ये सुधारणा होऊन खंडीमध्ये वायदे आल्यानंतर हा सर्वात निचांकी भाव आहे. Cotton Market

एमसीएक्सवर कापूस वायदे १३ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरु झाल्यानंतर ६३ हजार रुपये प्रतिखंडीचा भाव आला होता. एका खंडीमध्ये ३५६ किलो रुई असते. त्यानंतर बाजारात चढ उतार आले. पण आज हंगामातील निचांकी पातळी दाखवली.

दुपारी वायदे ५५ हजार ३४० रुपयांवर आले होते. त्यात काहीशी सुधारणा झाली. शेवटच्या टप्प्यात बाजारात आणखी बदल होऊ शकतो. कारण आज आठवड्याचा खेवटचा दिवस असल्याने दरात चढ उतार दिसतात.

बाजार समित्यांमधील भाव

बाजार समित्यांमधील भावाचा विचार करता आजही दर दबावातच होते. आज कापसाची जवळपास ५० हजार गाठींची आवक झाली होती. महाराष्ट्रातील बाजारात सर्वाधिक आवक दिसल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. तर गुजरातमधील आवक जास्त होती.

त्यामुळे बाजारात कापसाला आज सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये भाव मिळाला. कापसाचे भाव वाढत नसल्याने जास्त दिवस थांबू शकत नसलेले शेतकर बाजारात कापूस विकत आहेत, असे शेतकऱ्यांनी सांगितले. Cotton Market

आवकेचे गणित

जून महिना तसा बाजारासाठी ऑफ सिझन असतो. एरवी दरवर्षी जून महिन्यात कापूस भाव आवकेचा सिझनपेक्षा जास्त असतात. कापूस आवकेचा सिझन ऑक्टोबर ते जानेवारी असा चार महिन्यांचा समजला जातो. कापूस आवक या चार महिन्यांमध्येच जास्त होते. पण यंदा या चार महिन्यांमध्ये कापूस आवक कमी राहीली.

तर मार्चनंतर आवक वाढत गेली आणि दरात दबाव येत गेला. त्यातच सूत आणि कापडाला मागणी नसल्याचे उद्योगांकडून सांगण्यात येत होते. मागणी नसल्याचे सांगूण बाजारावर आणखी दबाव आणला. परिणामी शेतकऱ्यांना कमी भाव मिळाला.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top