कृषी महाराष्ट्र

Kharif Vegetables : खरीपसाठी भाजीपाल्याच्या कोणत्या जातींची निवड कराल ? वाचा संपूर्ण

Kharif Vegetables : खरीपसाठी भाजीपाल्याच्या कोणत्या जातींची निवड कराल ? वाचा संपूर्ण

Kharif Vegetables

Kharif Season : अनेक प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन (Vegetable Production) वर्षभर घेता येते. अल्पभूधारक शेतकरी अल्प भांडवलामध्ये कमी अवधीत अधिक उत्पादन भाजीपाला लागवडीतून मिळवू शकतात.

सर्वसाधारणपने अनियमित पाऊसमान असल्याने उपलब्ध पाणीसाठा कमी होत आहे. त्याचप्रमाणात कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पीक संरक्षणासाठीच्या खर्चात वाढ होत आहे.

अशा परिस्थितीत खरीप हंगामातील पोषक वातावरणामध्ये भाजीपाल्याचे उत्पादन घेणे फायद्याचे ठरु शकते.

खरीप हंगामात सर्व पालेभाज्या, वाटाणा, श्रावण घेवडा, वाल, चवळी, तांबडा भोपळा, दोडका, पडवळ, कारली, गवार, घोसाळी, वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, भेंडी, मुळा, गाजर, बटाट्यासारखी भाजीपाला पिके घेतली जातात.

गणपती झाल्यानंतर पितृ पंधरवाड्यामध्ये विविध प्रकारची भाजी यावी यासाठी लागवडीत पैसे मिळवता येतात. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात थंडी सुरु होण्यापुर्वी भेंडी उगवून एन थंडीत भेंडीचे हमखास पैसे होतात.

वेलवर्गीय भाज्यांमध्ये तांबडा भोपळा, तोंडली, कारले, दुधी भोपळा ही महत्वाची पिके आहेत. महाराष्ट्रात करटोली हे पीक फक्त पावसाळी हंगामात आढळून येते.

श्रावण घेवड्याची लागवड सर्वसाधारण पावसाळ्यात करतात. चांगला पाऊस पडल्यानंतर जुलैपर्यंत पेरणी करुन श्रावण घेवडा ९० ते ११० दिवसात काढणीस तयार होतो. Kharif Vegetables

महाराष्ट्रात लागवडीच्या दृष्टीने टोमॅटोचे वाण पुसा रुबी जे तीनही हंगामात घेता येते. लागवडीनंतर ४० ते ९० दिवसांनी फळे काढणीस येतात. पुसा गौरव या जातीची फळे लांबट गोल पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात.

आणि वाहतूकीस योग्य आहेत. अर्का गौरव, रोमा, भाग्यश्री, अर्का विकास, पुसा अर्ली व्डार्फ इ. जातींच्या टोमॅटोच्या वाणाची महाराष्ट्रात लागवड केली जाते. मांजरी गोटा, वैशाली, अरुणा, प्रगती या वांग्याच्या प्रमुख जाती आहेत तर पुसा ज्वाला, पंत सी – १, अग्गिरेखा, परभणी टॉल, फुले ज्याती, कोकणक्रांती, फुले मुक्ता, फुले सुर्यमुखी, एनपी ४६ या सारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या मिरचीच्या जाती लागवडीयोग्य आहेत. पुसा सावनी, फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, अर्का अनामिका या भेंडीच्या प्रमुख सुधारीत जाती लागवडीस योग्य आहेत.

source : agrowon

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top