कृषी महाराष्ट्र

या वर्षी कापसाला सरासरी नऊ हजार रुपये इतका दर मिळणार ?

या वर्षी कापसाला सरासरी नऊ हजार रुपये इतका दर मिळणार ?

 

जर आपण एकंदरीत कापूस उत्पादनाचा विचार केला तर एकंदरीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवर भाव बऱ्यापैकी आहेत. जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर मागच्या वर्षी जी कापूस पिकाची गत झाली होती तीच गत यावर्षी देखील झाली आहे. मागच्या वर्षी आपण पाहिले होते की झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे कापसाला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळाले होते.

यावर्षी देखील त्या सारखीच परिस्थिती उद्भवली असून कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे व आता जो काही कापूस काढणीला आला आहे तो परतीच्या पावसामुळे ओला होत आहे. सध्या कापसाचे बाजार भाव 8 ते 10 हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत असून सध्या कापसाचे प्रत थोडी ओलसरपणामुळे खालावलेली आहे.

जर आपण महाराष्ट्राप्रमाणेच भारताचा आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिकेचा विचार केला तर त्या ठिकाणीसुद्धा कापसाचा हंगाम सुरू झाला असून अमेरिकन कृषी विभागाने याठिकाणी कापसाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज जाहीर केला होता.

सध्या अमेरिकेतील कापसाची स्थिती

अमेरिकेमध्ये देखील दुष्काळ आणि काही ठिकाणी जास्त पावसाचा फटका कापूस पिकाला बसला असून त्या ठिकाणचे टेक्सास हे प्रमुख कापूस उत्पादक राज्य असून त्या ठिकाणी देखील कापूस उत्पादनात मोठी घट येण्याची शक्‍यता अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.

एवढेच नाही तर अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये देखील कापसाचे नुकसान झाले असल्यामुळे अमेरिकन कृषी विभागाचा ऑक्टोबर मधील अंदाज जो होता तो कमी होऊ शकतो.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या वायद्यांमध्ये सुधारणा झाली असून मागच्या आठवड्यामध्ये डिसेंबरचे कापसाचे वायदे 44 ते 45 सेंट प्रति पाउंड इतके होते. ते आज मितीला 87 सेंटच्या पुढे पोहोचले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजार भावाचा भारतात काय होईल फायदा ?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कापसाच्या दरात सुधारणा झाल्यामुळे भारतात देखील दराला आधार मिळत आहे. सध्या भारतामध्ये कापसाची आवक वाढत असून दिवाळीनंतर आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे.

परंतु आवक जरी वाढली तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय बाजारातील दरामुळे आपल्याकडेसुद्धा कापसाचे दर टिकून राहतील.जर आपण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कापूस बाजाराची स्थिती पाहिली तर यावर्षी देखील कापसाला सरासरी नऊ हजार रुपये इतका दर मिळू शकतो, असा देखील अंदाज जाणकारांनी व्यक्त केला असून शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करण्याचे आवाहन देखील जाणकारांकडून केले जात आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा – birdocean.com

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top