कृषी महाराष्ट्र

बदलत्या हवामानात पिकांची काळजी कशी घ्यावी ? वाचा कृषि तज्ञांचा हवामाना नुसार पीक सल्ला

बदलत्या हवामानात पिकांची काळजी कशी घ्यावी ? वाचा कृषि तज्ञांचा हवामाना नुसार पीक सल्ला

बदलत्या हवामानात पिकांची

हवामान अंदाजानूसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार कापूस, गहू, भुईमूग, सुर्यफूल, मका पिकात पुढील उपाययोजना कराव्यात.

हवामान अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील ३ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होऊन त्यानंतर हळूहळू २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. हवामान अंदाजानूसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेल्या सल्ल्यानूसार कापूस, गहू, भुईमूग, सुर्यफूल, मका पिकात पुढील उपाययोजना कराव्यात.

– कुठल्याही परिस्थितीत कापसाची फरदड म्हणजेच खोडवा घेऊ नये. कापूस पिकाची शेवटची वेचणी पूर्ण झाल्यावर पालापाचोळा, पराट्या जमा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

-काढणीस तयार असलेल्या तूर पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या तूरीची वाळल्यानंतर मळणी करून सूरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. रब्बी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे.

– उशीरा पेरणी केलेल्या भुईमूग पिकात मावा, फुलकिडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस एल) २ मिली किंवा क्विनॉलफॉस (२५ ईसी) २० मिली किंवा

ऑक्झीडीमेटॉन मिथाईल (२५ ईसी) २० मिली किंवा लॅम्बडासायहॅलोथ्रीन (५ ईसी) ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

-उशीरा पेरणी केलेल्या मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. वेळेवर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकास पोटरी येण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे.

उशीरा पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५टक्के) ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम (११.७ एससी) ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.

– रब्बी सूर्यफूल पिकाला दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असतांना पाणी द्यावे.

– गहू पिकास फुटवे फुटण्याच्या आवस्थेत पाणी द्यावे. गहू पिकावरील तांबेरा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल (२५ % ईसी) १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top