कृषी महाराष्ट्र

जिरेनियम शेती बद्दल माहिती – Geranium Cultivation

जिरेनियम शेती बद्दल माहिती – Geranium Cultivation

 

जिरेनियम शेती चा अलीकडच्या काळात काही ठिकाणी प्रयोग केला जातोय. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या प्रयोग यशस्वी केलाय. पण ही लागवड नेमकी करायची कशी, त्याचे तंत्र काय याची माहिती घेऊयात.

Geranium farming : अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिक असलेल्या दोन शेतकऱ्यांनी जिरेनियमची शेती यशस्वी केली आहे. पारंपरिक पिकांना बगल देत मेहेकरी येथील शेतकऱ्यांनी जिरेनियम शेती केल आहे. या पिकामुळे त्यांना वर्षाकाठी लाखोंचा नफा (profit) मिळत आहे. मात्र, जिरेनियम लागवडीचे तंत्र नेमके काय आहे. जिरेनियम लागवड कशी केली जाते ? त्यासाठी जमिन कशी लागते? जिरेनियम शेतीसाठी वातावरण कसे लागते, जिरेनियम शेती बद्दल माहिती आपण घेऊयात.

जिरेनियम म्हणजे काय ?

 • जिरेनियम हे एक गवतवर्गीय सुगंधी वनस्पती आहे.
 • याचा वापर अत्तर, परफ्यूम बनविण्यासाठी होतो.
 • परफ्यूम इंडस्ट्री कडून या पिकाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते.

जिरेनियमची लागवड मध्यम प्रतीच्या जमिनीवर आणि माळरानावरही करता येते. सर्वसाधारण 20 अंश सेल्सिअस ते 34 अंश सेल्सिअस तापमानात हे पीक चांगले येते. 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा 34 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात पिकांची वाढ खुंटते. त्यामुळे पाहिजे तसे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळत नाही. या पिकासाठी आद्रता 75 टक्के ते 80 टक्के लागते.

एका वर्षत तीन वेळा कापणी

तीन वर्ष हे पीक शेतात राहणार असल्याने शेतीची योग्य प्रकारे नांगरणी व मशागत करून घेणे खूप गरजेचे असते. मशागत केल्यानंतर बेड व्यवस्थित तयार करून घ्यावी. त्यावर ठिबक टाकावे आणि चार बाय दीड फुटावर त्याची लागवड करावी. एका एकरमध्ये 10 हजार रोपे लागतात. लागवडीनंतर पहिल्यांदा हे पीक चार महिन्यानंतर कापणीला येते व त्यानंतर प्रत्येक तीन महिन्याला कापणीला येते. हे पीक एका वर्षात तीनवेळा कापणीला येते.

सुरूवातीला एकरी 70 ते 80 हजार खर्च येतो. इतर पिकाच्या तुलनेत फवारणी व खते यामध्ये 75 टक्के खर्च कमी लागतो. एका एकरात तीस ते चाळीस किलो ऑईल वर्षाला मिळू शकते. एक लिटर ऑईलला किंमत जाग्यावर 12 हजार ते 12 हजार 500 हजार रुपये मिळू शकतात. एक एकरमध्ये एका वर्षात चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळू शकते.

जिरेनियमला भारतात मोठी मागणी

जिरेनियम तेलाला भारतात मोठी मागणी आहे. दर वर्षाला 200 ते 300 टनाची मागणी आहे. पण सध्यस्थिती पाहता भारतात वर्षाला 10 ते 20 टन पण ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळे या अशा सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करणे अधिक फायदेशीर ठरते. अशा या औषधी वनस्पतीची भारतात लाखो एकर शेती केली तरी कमीच आहे.

पारंपरिक पिकापेक्षा दुप्पट उत्पन्न

पारंपरिक पिकापेक्षा जिरेनियम हे पीक दुप्पट नफा देणारे आहे. या वनस्पतीवर फारसे किड रोग येत नाहीत. त्यामुळे खर्च कमी येतो आणि उत्पन्न जास्त आहे. कोणतेही जनावरं जिरेनियमचा पाला खात नाही. निरोगी आणि 100 टक्के उत्पन्न देणारे पीक आहे. तसेच जिरेनियम वनस्पतीच्या तेलाला शाश्वत बाजापेठ उपलब्ध आहे. बाजारामध्ये या पिकाला हमीभाव देखील मिळतो .

अशी घ्यावी काळजी

जिरेनियमच्या फांद्याची तोडणी करून त्यापासून तेल बनवले जाते. ज्या भागात जास्त पाऊस पडतो तेथे फक्त या पिकाची पावसाळ्यात जास्त काळजी घावी लागते. कारण जास्त पावसामुळे पिकाच्या खालच्या भागातील फांद्या खराब होऊ शकतात. उर्वरित ऋतूमध्ये या पिकावर काहीही परिणाम पडत नाही.

जिरेनियमपासून सुगंधी पदार्थांची निर्मिती

जिरेनियमच्या तेलापासून अनेक सुगंधी पदार्थ बनवले जातात. औषधे, कॉस्मेटिक्स साबण आणि डिटर्जंट शाम्पू , सेंट , अगरबत्ती पावडर या वस्तू तयार केल्या जातात. या वस्तुंना बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कापणीनंतर उरलेल्या पालापाचोळ्यापासून खत निर्मिती करता येते.

जिरेनियम बद्दल विशेष माहिती –

 • लागवडी करिता मध्यम जमीन लागवड
 • नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्ये २५ ते ३० डिग्री तापमानात वाढ उत्तम होते.
 • एकदा लागवड केल्यास तीन वर्ष उत्पन्न मिळते.
 • एका वर्षात तीनदा कापणी करावी लागते.
 • लागवडीकरीता एकरी १०००० रोपेलागवडीला एकरी ८० हजार खर्चकमी पाणी लागते.
 • खते, कीटकनाशके यांचा वापर खूप कमी करावा लागतो. यात आंतरपीक म्हणून शेवगा घेवू शकतात.
 • जिरेनियम पासून तेलनिर्मिती होते.
 • कापणीनंतर उरलेल्या पाल्यातून खत तयार करता येते.
 • एकरी सरासरी प्रतिवर्ष ४० टन पाला एक टन पाल्यापासून एक किलो तेल मिळते.
 • एकरी ३० ते ४० किलो तेल मिळते.
 • तेलाचा भाव ₹ १२५०० प्रति किलो
 • पहिल्या वर्षी लागवडी करिता दीड लाख खर्च नंतर प्रत्येक वर्षी सरासरी ५० हजार खर्च येतो.
 • कमी खर्चात भरपूर नफा मिळवून देणारे पीक

source: marathi.abplive.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top