कृषी महाराष्ट्र

Onion Rate : आळेफाटा उपबाजारात कांद्याला ५२१ रुपये भाव !

Onion Rate : आळेफाटा उपबाजारात कांद्याला ५२१ रुपये भाव !

 

Onion Market : आळेफाटा, ता. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील उपबाजारात रविवारी (ता. १०) कांद्यास प्रति दहा किलोस ५२१ रुपयांचा बाजारभाव मिळाला. या वेळी कांद्याच्या १३ हजार ६९६ पिशव्यांची आवक झाली होती. एक नंबर कांद्यास प्रति दहा किलोला ५२१ रुपये बाजारभाव मिळाला आहे, अशी माहिती सचिव रूपेश कवडे यांनी दिली.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा या ठिकाणी झालेल्या लिलवात एक नंबर कांद्यास प्रति दहा किलोस ते ५२१ रुपये बाजारभाव मिळाला तर एक नंबर सुपर गोळा जुन्या कांद्यास प्रति दहा किलोस ४५१ ते ५०१ रुपये भाव मिळाला होता.

तसेच एक नंबर कांद्यास ४२१ ते ४५१ रुपये भाव मिळाला‌. दोन नंबर कांद्यास ४०० ते ४२१ रुपये भाव मिळला. तर तीननंबर कांद्यास प्रति दहा किलोस २५० ते ३५० रुपये भाव मिळाला. तर चिंगळी (सर्वांत लहान कांदा) कांद्यास प्रति दहा किलोस ८० ते २५० रुपयांचा भाव मिळाला. Onion Rate

दरम्यान सरकारने कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यामुळे कांद्याचे बाजारभाव निम्म्यापेक्षाही कमी झाल्याने येथील बाजार समितीत शुक्रवारी (ता. ८) शेतकरी संतप्त झाल्याने उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन बाजार समितीत सुरू असलेले कांदा लिलाव बंद पाडल्याने काही काळ बाजार समिती परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यानंतर उपस्थित कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी, सरकारने कांद्याची निर्यात सुरू न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला होता. अद्याप कांदा निर्यात बंद असून ती सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

११ डिसेंबर कांदा बाजारभाव खालील प्रमाणे : 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/12/2023
कोल्हापूरक्विंटल6047150043002600
अकोलाक्विंटल776150035003000
छत्रपती संभाजीनगरक्विंटल2581120028002000
मुंबई – कांदा बटाटा मार्केटक्विंटल11509250045003500
हिंगणाक्विंटल4400042004200
जुन्नर – नारायणगावचिंचवडक्विंटल5450040002500
कराडहालवाक्विंटल150250030003000
सोलापूरलालक्विंटल12252410041002100
बारामतीलालक्विंटल219100042003000
अहमदनगरलालक्विंटल5051730032001900
येवलालालक्विंटल100050023702050
लासलगावलालक्विंटल3660170026112200
लासलगाव – निफाडलालक्विंटल1050140024012250
लासलगाव – विंचूरलालक्विंटल16950100027602400
जळगावलालक्विंटल171660522401475
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल400040026482300
सिन्नरलालक्विंटल51070027502400
सिन्नर – नायगावलालक्विंटल32100027012500
राहूरी -वांबोरीलालक्विंटल337450034002200
कळवणलालक्विंटल600110027652000
मनमाडलालक्विंटल300150026332200
पिंपळगाव(ब) – सायखेडालालक्विंटल3890100026122400
साक्रीलालक्विंटल152060021051500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल489100033002150
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल4595100036002300
पुणेलोकलक्विंटल11573180042003000
पुणे- खडकीलोकलक्विंटल1350035003500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5320042003700
पुणे-मांजरीलोकलक्विंटल100300050004000
पुणे-मोशीलोकलक्विंटल293120020001600
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल50086023461601
मंगळवेढालोकलक्विंटल68450033002600
कामठीलोकलक्विंटल5300040003500
कल्याणनं. १क्विंटल3380046004200
नाशिकपोळक्विंटल2394150028522500
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल8700150032402451
अहमदनगरउन्हाळीक्विंटल310570035002200
येवलाउन्हाळीक्विंटल100100024012200
नाशिकउन्हाळीक्विंटल72120038003000
लासलगावउन्हाळीक्विंटल90150033002500
लासलगाव – निफाडउन्हाळीक्विंटल165190027902700
लासलगाव – विंचूरउन्हाळीक्विंटल850100034803000
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल100079029062450
कळवणउन्हाळीक्विंटल1200100041002700
मनमाडउन्हाळीक्विंटल50150027002200
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल500175142003400
वैजापूरउन्हाळीक्विंटल221100031002100

Onion Market, Onion Rate

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top