कृषी महाराष्ट्र

टोमॅटोवरील कीड आणि रोग नियंत्रण : संपूर्ण माहिती

टोमॅटोवरील कीड आणि रोग नियंत्रण : संपूर्ण माहिती

टोमॅटोवरील कीड

रोग :

१) पर्णगुच्छ :

– रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो.

– पाने वरच्या बाजूस वळालेली दिसतात. झाड खुजे राहून पर्णगुच्छासारखे दिसते.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– पांढरी माशीच्या बंदोबस्तासाठी फवारणी करावी.

२) लवकर येणारा करपा :

– पाने पिवळी पडतात.

– खोडावर, फांद्यावर तपकिरी व काळपट रंगाचे ठिपके दिसतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– ॲझोक्सिस्ट्रॉबीन (२३ टक्के एस.सी.) १ मिलि किंवा

– किटाझीन (४८ टक्के ई.सी.) १ मिलि किंवा

– पायरॅक्लोस्ट्रोबीन (२५ टक्के डब्ल्यू.जी.) ०.५ ग्रॅम

३) मर रोग

– पानाच्या शिरा रंगहीन होऊन पाने पिवळी पडतात.

– झाडाच्या पेशी तपकरी होऊन कुजतात त्यामुळे अन्नपुरवठा खंडित होतो. परिणामी, झाडाची वाढ खुंटते.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– मेटॅलॅक्सिल-एम (३१.८ टक्के ई.एस.) २.५ ग्रॅम किंवा

– थायोफेनेट मिथाईल (३८ टक्के) अधिक कासुगामायसिन (२.२१ टक्के एस.सी.) (संयुक्त बुरशीनाशक) २.५ मिलि

४) फळसड :

रोगकारक बुरशी : अल्टरनेरिया सोलेनी

– फळधारणेच्या अवस्थेत जास्त प्रादुर्भाव दिसतो.

– फळांवर टोकाच्या बाजूस गोल तपकिरी डाग पडतात.

– फळे रंगहीन होऊन साल कातड्यासारखी होऊ फळे सडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– क्रेसॉक्सिम मिथिल (१८ टक्के) अधिक मॅन्कोझेब (५४ टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त बुरशीनाशक) १.५ ग्रॅम किंवा

– कॅप्टन (७० टक्के) अधिक हेक्साकोनॅझोल (५ टक्के डब्ल्यू.पी.) (संयुक्त बुरशीनाशक) १ ग्रॅम.

५) बॅक्टेरियल कॅंकर (देवी रोग) :

– पाने, खोड आणि देठावर फिक्कट हिरवे ठिपके, रेषा दिसतात.

– पाने अर्धवट जळालेली, वाकडी दिसतात.

– फळावर गर्द तपकिरी ते काळे उंचवट्यासारखे खरबडीत डाग पडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– कॉपर ऑक्सिक्लोराइड २.५ ग्रॅम अधिक स्ट्रेप्टोमायसीन सल्फेट* १ ग्रॅम (टॅंक मिक्स).

टोमॅटोवरील किडी :

१) फुलकिडे, मावा, तुडतुडे :

– पानांच्या कडा वरील बाजूस वळतात. किडींनी रस शोषल्यामुळे झाडे निस्तेज होऊन मरते.

– विषाणूजन्य रोगांचा प्रसार करतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि किंवा

– इमिडाक्लोप्रिड (७० टक्के डब्ल्यू.जी.) ०.१ ग्रॅम किंवा

– प्रॉपरगाईट (५० टक्के) अधिक बायफेन्थ्रीन (५ टक्के एस.ई.)(संयुक्त कीडनाशक) २ मिलि

२) पांढरी माशी

– पानांतील रस शोषते. पानाचा रंग पिवळसर होतो.

– फुलगळ होऊन फळधारणा होत नाही.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– सायॲन्ट्रानिलीप्रोल (१०.२६ टक्के ओ.डी.) १.८ मिलि किंवा

– डायफेन्थुरॉन (५० टक्के डब्ल्यू.पी.) १.२ ग्रॅम किंवा

– इमिडाक्लोप्रिड (१७.८० टक्के एस.एल.) ०.३ मिलि

३) फळे पोखरणारी अळी :

– अळी शेंड्याची किंवा रोपांचे पाने खाते.

– फळांना पोखरून त्यात विष्टा टाकतात. त्यामुळे फळे खराब होऊन सडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.३ मिलि किंवा

– इन्डोक्झाकार्ब (१४.५० एस.सी.) ०.८ मिलि किंवा

– नोव्हॅल्युरॉन (१० टक्के ई.सी.) १.५ मिलि

४) नागअळी किंवा पाने खाणारी अळी :

– अळी पानाच्या पापुद्र्याखाली राहून आतील भाग कुरतडते.

– पानांवर पांढऱ्या नागमोडी रेषा पडतात.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

इथिऑन (४० टक्के) अधिक सायपरमेथ्रीन (५ टक्के) (संयुक्त कीडनाशक) २.५ मिलि.

५) टुटा ॲबसोल्युटा अळी :

– अळी पानांमध्ये फुग्यासारखी गॅलरी तयार करते.

– पाने, फळांवर गॅलरी तयार करते. त्यानंतर तेथे बुरशीचा प्रादुर्भाव होतो.

रासायनिक फवारणी (प्रतिलिटर पाणी)

– इन्डोक्झाकार्ब (१४.५ एस.सी.) १ मिलि किंवा

– क्लोरॲन्ट्रानिलीप्रोल (१८.५ टक्के) ०.३ मिलि किंवा

– फ्लुबेन्डायअमाइड (४८० एस.सी.) ०.२५ मिलि

– डॉ. अनिकेत चंदनशिवे, ७०६५७९१११५ (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

source : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top