कृषी महाराष्ट्र

निर्जलीकरणातून कांद्याचे मुल्यवर्धन व त्याचे कांदा उत्पादनातील महत्व

निर्जलीकरणातून कांद्याचे मुल्यवर्धन व त्याचे कांदा उत्पादनातील महत्व

निर्जलीकरणातून कांद्याचे

प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढत आहे.

भारतातील एकूण भाजीपाला उत्पादनामध्ये कांद्याचे (Onion) प्रमाण ६ टक्के आहे. कांद्याच्या दरावर अधिक उत्पादन, शासनाचे निर्यात धोरण इ. चा परिणाम होतो. त्यामुळे कांद्याचे दर (Onion Rate) काही वेळा चढे तर काही वेळा अत्यंत कमी होतात. यावर उपाय कांदा निर्जलीकरण हा किफायतशीर व फायद्याचा मार्ग आहे. स्वादिष्ट चवीसोबत कांद्यामध्ये असलेला विशिष्ट झणझणीतपणामुळे, कांदा विविध पदार्थ व औषधी गुणधर्मांसाठी वापरला जातो.

कांद्याची पावडर, काप, कीस इ. उत्पादनांना हॉटेल व्यवसायात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कांद्यामधील घटक मोतीबिंदू, मूत्राशय, मुळव्याध, रक्तस्राव, कर्करोग, हृदय व रक्तवाहिन्या संदर्भातील आजार यासाठी उपयुक्त आहेत. फ्लुईडाइज्ड बेड ड्रायिंग, व्हॅक्युम मायक्रोवेव्ह ड्रायिंग, सोलार ड्रायिंग इ. तंत्राच्या मदतीने हवेचा वेग व तापमान नियंत्रित करून कांद्याचे मूल्यवर्धन केले जाते. प्रक्रियायुक्त व मूल्यवर्धित कांद्याचे जागतिक बाजारपेठेत महत्त्व वाढत आहे.

कांद्याचे निर्जलीकरण कसे करायचे ?

या प्रक्रियेदरम्यान कांद्यातील मुक्त पाणी बाष्पाच्या स्वरूपात काढले जाते. कांद्याचे सूक्ष्मजीवांपासून संरक्षण व्हावे यासाठी प्रक्रिया केली जाते.

निर्जलित कांदे हवाबंद कॅनमध्ये निर्यात केले जातात.

योग्य वेष्टन व साठवणूक तापमान असल्यास ६ ते १२ महिने हे कांदे टिकतात.

निर्जलित कांद्यांना युरोप बाजारपेठेत प्रमुख मागणी आहे.

निर्जलित कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो. यासाठी मुख्यत्वे पांढरा कांदा वापरला जातो. उदा. बॉम्बे व्हाइट, पुसा व्हाइट. लाल कांद्याच्या प्रजातीमध्ये उदयपूर-१०१, पंजाब रेड इ.

कांद्याचे काप, पावडर, फ्लेक्स तयार करण्यासाठी फ्ल्यूडाईज्ड बेड ड्रायिंग पद्धत वापरली जाते.

कांद्याचे १.५ मि. मी. जाडीच्या आकाराचे काप करून ४०, ५० आणि ६५ अंश सेल्सिअस तापमानाला ड्रायरमध्ये ठेवले जातात. या तापमानाला कांद्यातील आम्ल व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्मजीवांपासून संरक्षित केले जाते.

कांदा निर्जलीकरणासाठी मायक्रोवेव्ह ही जलद, सोपी, कार्यक्षम पद्धत आहे. या पद्धतीमुळे ऊर्जेची बचत तर होतेच शिवाय कमी भांडवल लागते.

कांद्याचे निर्जलीकरण म्हणजे काय ?

कांद्यामध्ये जवळजवळ 90 टक्के पाणी असतं.कांद्या मधील हे पाणी बाष्पाच्या स्वरूपात बाहेर काढणे व कांद्याचे सूक्ष्मजीव आणि इतर घटकांपासून संरक्षण व्हावे यासाठी ही प्रक्रिया केली जाते. निर्जलीकरण प्रक्रिया केलेले कांदे हवाबंद डब्यात मध्ये पॅक करून निर्यात केले जातात. निर्जलीकरण केलेले कांदे हे सात ते बारा महिन्यांपर्यंत चांगले टिकतात.

कांदा निर्जलीकरण या विषयी महत्त्वाचे मुद्दे

निर्जलीकरण करण्यासाठी शक्यतो पांढरा किंवा अधिक टीएस एस असलेला कांदा वापरला जातो. निर्जलीकरण कांद्याच्या उत्पादनामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो.
कांदा निर्जलीकरण करण्यासाठी कांद्याचा शेंडा व टोका कडील भाग कापून व त्यावरील साल काढून चार ते आठ मी मी जाडीच्या चकत्या करतात.

या तयार केलेल्या चकत्या मिठाच्या द्रावणात दोन तास भिजत ठेवून 55 ते 60 अंश सेल्सिअस तापमान असणाऱ्या फ्लूडाईझ्ड बॅड ड्रायरमध्ये 11 ते 13 तासांसाठी ठेवतातया तापमानाला कांद्यातील आंबलं व साखर तीव्र स्वरूपात एकवटून सूक्ष्म जिवाणू पासून संरक्षण केले जाते.

प्रक्रियायुक्त मालाचा उच्च दर्जा टिकविण्यासाठी तो हवाबंद डब्यात किंवा प्लास्टिक पिशव्यामध्ये पॅक करतात. कांदा निर्जलीकरण केल्यास अनेक प्रकारचे फायदे होतात. प्रामुख्याने सुकवलेल्या कांद्याचा वाहतूक खर्च हा तुलनेने कमी येतो. तसेच निर्जलीकरण केलेल्या कांद्याचे नुकसान होत नाही.
परदेशांमध्ये कांदा चकत्या व पावडर यांचा उपयोग मांसच्याहवाबंद पदार्थामध्ये स्वास, चिलि या सारख्या पदार्थांमध्ये करतात.

source:agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top