कृषी महाराष्ट्र

PM Kisan 2022 : पीएम किसानचा १३ वा हप्ता कधी ? वाचा सविस्तर

PM Kisan 2022 : पीएम किसानचा १३ वा हप्ता कधी ? वाचा सविस्तर

PM Kisan 2022

८ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२ व्या टप्प्यातील रक्कम जमा करण्यात आली होती. १३ व्या टप्प्यातही ८ कोटींच्या जवळपास शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळू शकतात.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan) योजनेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजारांची मदत केली जाते. शेतकऱ्यांना या योजनेत (Farmer Scheme) ४ महिन्यांच्या अंतराने ३ टप्प्यात २-२ हजार रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. या योजनेच्या १२ टप्प्यांचे वाटप करण्यात आले आहे. १३ वा टप्पा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होऊ शकते.

८ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १२ व्या टप्प्यातील रक्कम जमा करण्यात आली होती. १३ व्या टप्प्यातही ८ कोटींच्या जवळपास शेतकऱ्यांना २ हजार रुपये मिळू शकतात. त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसेल असे शेतकरी १३ व्या टप्प्यापासून वंचित राहू शकतात.

१२ व्या टप्प्यात मोठ्या संख्येने लाभार्थी या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आले होते. सर्वाधिक अपात्र शेतकऱ्यांची संख्या उत्तरप्रदेशमध्ये होती. त्यानुसार १३ व्या टप्प्यातही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात येण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. लभार्थी शेतकरी पीएम किसानच्या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिकची माहिती घेऊ शकतात.

दरम्यान या योजनेतून वगळण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांबाबत विरोधी पक्षाने सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. या योजनेचा पहिला टप्पा २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वाटप करण्यात आला होता.

स्रोत : agrowon.com

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top