कृषी महाराष्ट्र

गुग्गुळ औषधी वनस्पती लागवडीसाठी सरकार देणार एकरी 48 हजार रुपये अनुदान

गुग्गुळ औषधी वनस्पती लागवडीसाठी सरकार देणार एकरी 48 हजार रुपये अनुदान

 

अनेक शेतकरी नवनवीन औषधी वनस्पतींची (Medicinal plants) लागवड करून चांगले उत्पादन घेत असतात. आज आपण अशाच औषधी वनस्पतीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सरकार 80 टक्के अनुदान देत आहे. आपण गुग्गुळ या वनस्पतीबद्दल बोलत आहोत.

या आजारांवर गुणकारक

सांधेदुखी, हृदयरोग, गंडमाला, आमवात, त्वचारोग, दंतरोग, कृमीनाशक, मूळव्याध, भगंदर, कुष्ठरोग, नेत्ररोग, पांडुरोग, मूत्रविकार, स्त्रीरोग, सूज कमी करणे, मोडलेले हाड जोडणे इत्यादी आजारांवर गुग्गुळ वनस्पती गुणकारक आहे. या वनस्पतीचा भारतात र्‍हास होत चालला आहे.

एकेकाळी भारतातून गुग्गुळ वनस्पतीची निर्यात होत होती. परंतु डिंक काढण्याच्या अशास्त्रीय पद्धतीमुळे गुग्गळाची बरीच झाडे नाश पावली. सध्या भारताला दरवर्षी पाच ते सहा हजार टन गुग्गुळ पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आयात करावे लागत आहे.

दिवसेंदिवस दुर्मीळ होत जाणारी वनस्पती (Guggul medicinal plant) आणि वाढती गरज लक्षात घेता गेल्या काही वर्षांपासून भारत सरकार गुग्गुळ लागवडीस प्रोत्साहन देत आहे. एकरी 48,000 रुपये अनुदान भारत सरकाने गुग्गुळ लागवडीसाठी मंजूर केले आहे. शेतकऱ्यांना नक्कीच या शेतीचा फायदा होऊ शकतो.

गुग्गुळ लागवड

गुग्गुळाचे झाड 12 ते 15 फूट वाढणारे असून ते कोणत्याही जमिनीत येते. उष्ण आणि कोरडे हवामान या वनस्पतीसाठी (plant)पोषक आहे. या झाडाला काटे येत असल्यामुळे जनावरे खाण्याची भीती आहे. गुग्गुळाची लागवड केल्यानंतर सहा वर्षांनतर डिंक मिळण्यासाठी सुुरुवात होते. त्याचबरोबर व्यापारी उत्पादन मिळवण्यासाठी अंदाजे आठ वर्षे लागतात. गुग्गुळ औषधी वनस्पती

बियांपासून रोपांचे उत्पादन 5 टक्केपर्यंतच होते. त्यामुळे रोपांचे निर्माण कटिंग्जपासून केले जाते. अंदाजे तीन ते चार महिन्यांची रोपे लागवडीसाठी योग्य असतात. लागवडीपासून सहा फूट रोपांतील अंतर आणि सहा फूट रांगेचे अंतर ठेवा.

खड्डा घेतल्यानंतर त्यात पालापाचोळा दोन पाट्या कुजलेले शेणखत, दोन किलो निंबोळी पावडर मिसळून खड्डा भरून घ्या. शक्यतो पावसाळ्यात लागवड करणे फायद्याचे ठरते.

पावसाळ्यानंतर फेबु्रवारीपर्यंत महिन्यातून 1 वेळा पाणी द्या. वर्षातून दोन वेळा शेणखत दिल्यास उत्पादन (production) वाढू शकते. या वनस्पतीवर शक्यतो रोग पडत नाही. परंतु पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव वनस्पतीवर होऊ शकतो.

या वनस्पतीचे आयुष्य 400 ते 500 वर्षे असल्याने पुढील कित्येक पिढ्या ही वनस्पतीमधून चांगले उत्पादन मिळते. पडीक जमिनीवर फारसे कष्ट न घेता सुरुवातीच्या लागवडीसाठी येणार्‍या खर्चापैकी 80 टक्के सरकारी अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे.

श्रोत :- marathi.krishijagran.com

 

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top