कृषी महाराष्ट्र

PM Kisan योजनेच्या यादीतील नाव कसे तपासावे; यादीत नाव नसेल तर तक्रार कुठे द्यावी ?

PM Kisan योजनेच्या यादीतील नाव कसे तपासावे; यादीत नाव नसेल तर तक्रार कुठे द्यावी ?

 

पंतप्रधान किसान(PM Kisan ) सम्मान निधि योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून देण्यात येतात. यापैकी बाराव्या हप्त्याचे  वितरण कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे काल कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळाला असून  दिवाळीच्या तोंडावर शेतकरी बंधूंना थोडाफार का होईना दिलासा मिळाला आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०२२ चे उद्देश्य –

भारत एक कृषि प्रधान देश आहे. भारतातील ७५ टक्के लोक शेती करतात किंवा शेतीवर अवलंबून आहेत. ही गोष्ट लक्षात घेऊन भारत सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत पोहचविण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरूवात केलीया योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना आत्म निर्भर बनवणे तसेच त्यांना सशक्त करणे हे या योजनेचे मुख्य उदिष्ट आहे.

या योजनेचा फायदा आठ कोटी शेतकऱ्यांना मिळाला असून त्यापोटी एकूण सोळा हजार कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.

परंतु काही कारणास्तव तुम्ही लाभार्थी आहात परंतु तुमच्या खात्यात पैसे आलेले आहेत किंवा नाहीत हे तुम्ही तपासू शकता आणि जर पैसे आले नसतील तर कोणत्या नंबर वर तक्रार नोंदवायची, याबद्दलची माहिती या लेखातून  घेऊ.

 अशा पद्धतीने तपासा यादीतील तुमचे नाव

1- तुम्हाला तुमचे नाव यादीत तपासायचे असेल तर त्यासाठी सगळ्यात अगोदर पी एम किसान (PM Kisan ) योजनेचे अधिकृत संकेतस्थळ https://pmkisan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

2- त्यानंतर स्क्रीन वरील होमपेज हा पर्याय निवडावा व त्या ठिकाणी बेनिफिशियरी स्टेटस अर्थात लाभार्थी स्थितीचा पर्याय निवडावा.

3- त्यानंतर स्क्रीनवर एक नवीन पेज उघडते व त्यानंतर तुम्ही राज्य, तुमच्या जिल्हा तसेच ब्लॉक आणि गावाच्या नावासहित विचारलेली सर्व माहिती नमूद करावी.

4- त्यानंतर तुम्हाला तुमचे बँक खाते आणि तुमच्या आधार क्रमांकाची लिंक असलेला तुमचा रजिस्टर मोबाईल क्रमांक टाकावा लागेल.

5- ही प्रक्रिया केल्यानंतर पी एम किसान लाभार्थी यादी 2022 तुमच्यासमोर ओपन होते या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

यादीत तुमचे नाव आहे परंतु खात्यात पैसे आले नाही तर या नंबर वर करा कॉल

समजा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लाभार्थी यादीत तुमचे नाव आहे परंतु खात्यात पैसे आले नाहीत, तर तुम्ही 155261/011-24300606 क्रमांकावर कॉल करून तक्रार नोंदवू शकता.

शेतीविषयी माहिती व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरा व आपल्या ग्रुप मध्ये शामिल व्हा..

नवीन माहिती
Scroll to Top